Thursday, December 24, 2009

गो गोवा

गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळण्याच्या घटनेला १९ डिसेंबरला ५० वर्ष झाली. एक पर्यटन केंद म्ह
णून सगळं जग गोव्याकडं पाहतंय. या निमित्ताने गोव्याच्या पर्यटनस्थळांवर टाकलेला दृष्टिक्षेप! ...... गोवा म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते सुंदर समुदकिनारे, प्रशस्त आणि कलाकुसरीने सजलेली मंदिरं आणि चचेर्स, किल्ले आणि अभयारण्यं, मांडवीची खाडी आणि त्यांच्या काठी वसलेलं पाणजी शहर आणि बरंच काही. गोव्याच्या पर्यटनाला सुरुवात होते ती त्याच्या राजधानी पणजीपासून! पणजीवर लॅटिन संस्कृतीची वळणं आहेत. असं म्हणतात की पणजीचा चेहरा अगदी तिच्या आईसारखा म्हणजे पोर्तुगालसारखा आहे. पणजीत प्रेक्षणीय स्थळं भरपूर! गेव्याला जर तुमची धावती भेट असेल आणि तुम्हाला गोवा समजून घ्यायचाय तर तुमच्या मदतीला येतं ते पणजी संग्रहालय. हे संग्रहालय गोव्याच्या जवळपास सर्वच अंगांवर प्रकाश टाकतं. त्याचबरोबर गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचं स्मारक, सचिवालय, काबोराज निवास, पोर्तुगीजकालीन गॉशपर दि अॅश किल्ला, कला अकादमी, जिच्यावरून संपूर्ण पणजी आणि मांडवी खाडी दृष्टीपथात येते ती अल्तिनो टेकडी, मिरामारसारखा शांततेचा अनुभव देणारा समुदकिनारा असं बरंच काही पाहण्यासारखं आहे. पणजी पाठोपाठ फोंडा, मडगाव, वास्को द गामा, म्हापसा ही शहरंही पाहण्यासारखी. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं. इतिहास वेगळा. गोव्याचं सर्वात आकषिर्त करणारं वैशिष्ट्य म्हणजे तिथले स्वच्छ आणि सुंदर समुदकिनारे! काहीसे अवखळ काही शांत, काही खडकाळ. प्रत्येकाला निसर्गाने दिलेलं रूप वेगळंच. त्यामुळेच गोव्याते समुदकिनारे परदेशी आणि देशी अशा दोन्ही पर्यटकांनी कामच गजबजलेले असतात. कलंगुट, कोलवा, मिरामार, अंजुना, वाघातोर, बोगमालो, बागा, डोना पावला असे 'एक से एक' समुदकिनारे गोव्याची शान आहेत आणि (त्यांना अनुभवणे) तिथलं वातावरण खरोखरचं एक वेगळी अनुभूती देऊन जातं. गोवा पर्यटकांना आपल्या सांस्कृतिकतेचं दर्शन घडवतो ते तिथल्या मंदिर आणि चचेर्समधून! असं म्हणतात की गोमंतक भूमी परशुरामानं वसवली. त्यावेळी परशुरामाने यज्ञासाठी त्रिहोत्रपुराहून सारस्वत ब्राम्हणांची ६४ कुळं गोमंतकात वसवली त्यावेळी त्यांचे देवही परशुरामाने त्यांची पुन:प्रतिष्ठापना केली ती गोमंतकात. तिच दैवतं म्हणजे आजची गोव्यातली प्रसिद्ध मंदिरं! मंगेश, शांतादुर्गा, महालक्ष्मी, नागेशी, रामनाथ, शिवाजी महाराजांनी बांधलेलं श्री सप्तकोटीश्वराचं देवालय अशी कलाकुसरीनं नटलेली मंदिरं आहेत. गोव्यातल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, प्रशस्त आवार, मंदिरांच्या समोर असलेली वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ, देवालयासमोर असलेली प्रशस्त तळी आणि तिथे साजरे केले जाणारे उत्सव मांगल्याने भारून टाकलेले आणि तितकेच अभ्यासपूर्ण. गोव्याच्या सांस्कृतिकतेचं दुसरं महत्त्वाचं अंग म्हणजे चचेर्स. गोव्यात इ. स. १५०० च्या आसपास वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने पाय ठेवला आणि गोव्यात ख्रिस्तपर्वाला सुरुवात झाली. गोव्यात बाँझिझस बॅझिलिका म्हणजेच सेंट झेवियर्स चर्च, सेंट फ्रान्सिस असिसि चर्च, सी कॅथेड्रेल चर्च, अवर लेडी ऑफ रोझरी आणि मोठ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण घंटेमुळे आणि उंचावर असलेलं अल्तिनो टेकडंवरचं चर्च अशी काही वैशिष्ट्यपूर्ण चचेर्स प्रसिद्ध आहेत. त्यातलं सर्वांचं लक्ष वेधून घेणारं चर्च म्हणजे बाँझिझस बॅझिलिका म्हणजेच सेंट झेवियर्स चर्च. या चर्चचं संपूण बांधकाम जांभा दगडातलं आहे आणि सेंट झेवियर्सच्या जवळ जवळ चारशे वषेर् जतन करून ठेवलेल्या देहांमुळे हे चर्च प्रसिद्ध आहे. सेंट झेवियर्स नावाचे महान संत होऊन गेले. त्यांचे धर्मप्रसाराचे मुख्य कार्यक्षेत्र गोवा होतं पण ते धर्मप्रसारासाठी फिरत असताना चीनमध्ये त्यांचं निधन झ्घलं. त्यांच्या गोवन भाविकांना त्यांचा देह आपल्याच शहरात राहावा, असं वाटलं. त्यामुळे प्रथम चिनी बेटावर पुरलेलं त्यांचं प्रेत काढून ते ओल्ड गोवा इथं आणण्यात आलं. आजही ते प्रेत इथं जतन करण्यात आलंय आणि दर दहा वर्षांनी ते दर्शनासाठी बाहेर काढलं जातं या सणास 'फेस्ता' म्हणतात. मंदिर, चचेर्सप्रमाणे गोव्याला किल्ल्यांचाही वारसा लाभलाय. महाराष्ट्र-गोवा सीमेवरचा तेरेखोल किल्ला, आग्वाद, छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला दुर्भाट हे किल्ले प्रसिद्ध आहेत. गोव्यावर निसर्गाचा वरदहस्त आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवाई दिसते. भगवान महावीर, बोंडला, खोतीगाव ही वन्यजीव अभयारण्यं निसर्गप्रेमींसाठी जणू नंदवनच. पणजीच्या जवळ असणाऱ्या चोराव बेटावरचं डॉ सलीम अली पक्षी अभयारण्यही पर्यटकांचं आकर्षण आहे. पु. ल. देशपांडेंच्या 'तुम्हाला कोण व्हायचंय मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' लेखात 'वडाभाताचा मजा काही औरच आहे' वगैरे सांगणाऱ्या नागपूरकरांना पु.ल. म्हणतात, 'पदार्थांचा जास्त तपशील देऊ नका, एखादा गोवेकर बांगड्यांचे पन्नास प्रकार सांगेल आणि तुमच्या वडाभातापुढे तुम्हाला जाता यायचं नाही', ही उक्ती खरोखरच गोव्याच्या खवय्येगिरीत सार्थ ठरते. गोव्याचं मुख्य अन्न भात आणि मासे. त्यातले प्रकार खरोखरच जीभेचे चोचलं पुरवतात. त्यातही हॉटेलपेक्षा घरगुती गोवन जेवणाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच. गोव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाजेर्तून प्रवास. मांडवी ही गोव्याची मुख्य नदी आणि अशा या नदीतून प्रवास करणे एक वेगळीच मजा असते. दोन्ही काठांवर उतरत्या छपरांची घरं आणि आपल्याकडे डोकावून पहाणारी नारळीची झाडं! मांडवी गोव्याचं एक वेगळंच अंतरंग दाखवून जाते.

Friday, December 11, 2009

उपाशी ड्रीम डेस्टिनेशन

>
जगात एक अब्जाहून जास्त लोक उपाशी आहेत. दर पाच सेकंदांनी एक मूल भुकेमुळे हे जग सोडून जातं. भुकेच्या या फेऱ्यात
तिसऱ्या जगातले देश आहेतच, पण असंख्य भारतीयांना आपलं 'ड्रीम डेस्टिनेशन' वाटणारी अमेरिकाही आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अलीकडेच झालेल्या अन्नसुरक्षा परिषदेत ही आकडेवारी समोर आली. तिला आधार अमेरिकेच्या शेतीखात्यानं केलेल्या पाहणी अहवालाचा आहे. या अहवालानुसार अमेरिकेतील पाच कोटींहून अधिक लोक रोज उपाशी किंवा अर्धपोटी झोपी जातात.

या अहवालानं अमेरिकन सरकारची झोप मात्र उडाली आहे. वाढती बेकारी, अत्यंत कमी पगाराची कामं यामुळं दर सहा माणसांमागं एकाला पुरेसं अन्नधान्य विकत घेणं मुश्कील झालं आहे. 'हा आकडा म्हणजे सावधानतेचा इशारा आहे... देशातल्या अन्नसुरक्षेबाबत, भरणपोषणा-बाबत आणि वाढत्या भुकेबाबत सावध करणारा इशारा...!' असे उद्गार अमेरिकेचे शेती सचिव टॉम विल्सॅक यांना काढावे लागले यातच सर्व आलं. हा पाहणी अहवाल २०१०मध्ये पूर्ण स्वरूपात प्रकाशित होईल. तोपर्यंत भुकेल्या लोकांचा आकडा आणखी भयावह झालेला असेल, अशी भीतीही विल्सॅक यांनी व्यक्त केली आहे. या अहवालानुसार सुमारे पावणेसात कोटी लोकांना नियमित आणि पुरेसं खायला मिळत नसल्यानं ते 'निकृष्ट अन्नसुरक्षा' लाभलेल्या वर्गवारीत मोडतात. त्यांच्यापैकी ९६ टक्के लोकांची अवस्था अशी की, त्यांनी एक वेळचं खाणं आणलं तर दुसऱ्या वेळचं आणेपर्यंत त्यांच्याकडले पैसे संपलेले असतात. यांपैकी कुणालाही संतुलित आहार वगैरे पाहायलाही मिळत नाही. गेले वर्षभर हीच अवस्था या लोकांच्या वाट्याला आलेली असली, तरी गेल्या तीन-चार महिन्यांत तिची तीव्रता वाढली आहे. या पावणेसात कोटी लोकांपैकी निम्म्या लोकांचं वजन घटलेलं आहे. अशा घरांतल्या अर्धपोटी मुलांची संख्या आहे १ कोटी ७ लाख. घरात असेल नसेल ते मुलांना खाऊ घालून आईवडील उपाशी राहिले तरी तीव्र भुकेशी सामना करावा लागणाऱ्या मुलांची संख्या एक कोटीच्या खाली जात नाही.

आणखी काही कोटी अमेरिकन इतके गरीब आहेत की, सरकारकडून त्यांना 'फूड स्टँप्स' तरी मिळतात किंवा 'फीडिंग अमेरिका'सारख्या फूड बँकांकडून अन्न मिळतं! त्यामुळे त्यांचा उपास टळलाय. वेस्ट व्हजिर्नियासारख्या राज्यांत तर दर सहामागं एकाला फूड स्टँपवरच जगावं लागतंय. आपल्या २०० फूड बँकांमार्फत अडीच कोटी अमेरिकनांना अन्नपुरवठा करणाऱ्या 'फीडिंग अमेरिका'चे प्रमुख विकी एस्कारा यांना ही स्थिती आणखी बिघडत जाण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यांच्या मते हे आकडे २००८चे आहेत आणि गेल्या वर्षभरात परिस्थिती इतकी खालावलीय की ते आता नक्कीच वाढलेले असतील. फीडिंग अमेरिकाकडे आजवरच्या इतिहासात नव्हती इतकी 'इमर्जन्सी फूड'ची मागणी दिवसागणिक वाढलीय. गेल्या वर्षभरात या बँकांना आपल्या साठ्यांत ५० टक्क्यांहून अधिक वाढ करावी लागलीय. या स्थितीत अधिकाधिक लोकांना फूड स्टँप देण्याचा निर्णय ओबामा सरकारला घ्यावा लागलाय.

अमेरिकेत गेल्या वर्षापासून असलेली मंदी या भुकेमागं आहे हे खरं आहे; पण गोऱ्यांची बहुसंख्या असलेल्या उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडील मिसिसिपी, टेक्सास व अर्कान्सास ही राज्यं भुकेच्या फेऱ्यांत वाईट पद्धतीनं सापडली आहेत. उपाशी, अर्धपोटी असलेल्यांत कृष्णवणीर्य आणि हिस्पॅनिक नागरिकांची टक्केवारी निम्म्याहून अधिक आहे... अमेरिकेतल्या या वास्तवात आणि आपल्या वास्तवात काही साम्य आहे, असं नाही वाटत तुम्हाला?

Friday, October 9, 2009

कहाणी एका लग्नाची!

काय आहे? प्रश्‍न-प्रश्‍न आणि फक्त प्रश्‍नच आहेत समोर!(मजकुरातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)सुजाताच्या एकदम लक्षात आलं, की अमृताला माहेरी पाठवल्याला आठ दिवस होऊन गेले, पण अजूनही तिचे आई-वडील किंवा कोणी नातेवाईक, कोणीही कुठल्याच मार्गाने सुजाताशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी जाणूनबुजून फसवणूक केलीय, या शंकेला पुष्टी देणारीच ही गोष्ट होती.एक-दीड वर्षापूर्वीची गोष्ट. माझी मैत्रीण सुजाताच्या मुलाचं - अनिकेतचं नुकतंच लग्न झालं होतं. लगेचच दोघं कुलू-मनालीला गेले होते. आता ते आले असतील आणि एकूणच हालहवाल विचारावी म्हणून मी तिला फोन केला. म्हटलं, ""आले का चिरंजीव? कसे आहेत?'' वगैरे. तर म्हणाली, ""अगं, कसलं काय! माझं तर डोकंच चालेनासं झालंय. बरं झालं तू फोन केला...'' आणि तिनं जे सांगितलं ते ऐकून मलाही धक्काच बसला.तिच्या सुनेला - अमृताला चष्मा होता. ती लेन्सेस वापरत होती. दोघं हनीमूनहून आल्यावर अनिकेत सुजाताला म्हणाला, ""आई, अमृताला अडीचच नंबर आहे, पण त्यामानाने तिला दिसण्याबाबत खूपच प्रॉब्लेम आहे असं वाटतंय.'' आणि त्यानं तिकडे त्याला आलेले काही अनुभव सांगितले. मग सुजातालाही जाणवलं, की एकूण घरात वावरताना तिलाही अमृताबद्दल असंच मनात आलं होतं. म्हणून ती म्हणाली, ""ठीक आहे. अजून तुमची सुटी आहे तर तिला डॉक्‍टरांकडे घेऊन जा. लेसरचे वगैरे काही उपचार हवे असतील तर करून घेऊ.''दोघंही डॉक्‍टरांकडे गेले. त्यांनी टेस्ट्‌स घेतल्या. ते खूपच गंभीर झाले होते. ते म्हणाले, ""हिचा नंबर खूपच जास्त म्हणजे सोळा आहे. हिला लेसर ट्रिटमेंटचा काहीही उपयोग नाही. एवढंच नाही तर हिला हाय-मायोपिया आहे. म्हणजे हिचा रे टिना इतका कमजोर आहे, की केव्हाही सरकू शकतात आणि तिला अंधत्व येऊ शकतं. ऑपरेशन करून ते नीट करता येतं; पण यशाची काहीच खात्री नाही आणि असं किती वेळा करावं लागेल याचाही काही अंदाज बांधू शकत नाही.'' हे सगळं ऐकल्यावर अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली. काही न बोलता दोघं घरी आले. सुजाताला सगळं सांगितलं. तीही सुन्न झाली. बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, की त्यातून सावरायला, विचार करायला वेळ मिळावा म्हणून अ मृताला माहेरी पाठवून दिलं. सुजाता तर धीराची, संयमी आहेच, पण त्या प रिस्थितीत संतापून, वेडंवाकडं बोलणं, वागणं, आक्रस्ताळेपणा वगैरे काहीही न करता अनिकेत ज्या संयमानं वागला त्याचं आम्हाला खूपच कौतुक वाटलं.पुढे काय करायचं ते बघायला हवंच होतं. इतकी गंभीर बाब आहे तेव्हा "सेकंड ओपिनियन' घ्यावं म्हणून दुसऱ्या नेत्ररोगतज्ज्ञांनाही दाखवलं. त्यांनीही तेच सांगितल ं. दोन्ही डॉक्‍टरांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र अनिकेतला जाणवली होती ती म्हणजे दोघांनीही त्याला "लव्ह-मॅरेज आहे का' असं विचारलं आणि ऍरेंज्ड मॅरेज आहे तर एवढा मोठा दोष तुम्हाला सांगायलाच हवा होता, असं म्हणाले. थोडक्‍यात काय, तर प्रेमात पडलेला माणूसच एवढा गंभीर दोष उघड्या डोळ्यांनी स्वीकारू शकतो अन्यथा ही सरळसरळ फसवणूक आहे, असंच दोघांनीही अप्रत्यक्षपणे सुचवले होते. शिवाय हे म्हणजे चक्रव्यूहात आपण होऊन शिरण्यासारखं आहे. ज्याला बाहेर यायचा रस्ताच नाहीय. लग्नाला पंधराच दिवस झाल्येत आणि एवढी मोठी फसवणूक समोर आल्येय. अशा वेळी भावनेच्या आहारी जाऊ नकोस. व्यवहारीपणे विचार कर, असा सल्लाही आपण होऊन दिला होता.आता पुढे काय करायचं, असा विचार करताना सुजाताच्या एकदम लक्षात आलं, की अमृताला माहेरी पाठवल्याला आठ दिवस होऊन गेले, पण अजूनही तिचे आई- वडील किंवा कोणी नातेवाईक कोणीही कुठल्याच मार्गाने सुजाताशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी जाणूनबुजून फसवणूक केलीय या शंकेला पुष्टी देणारीच ही गोष्ट होती. मग सुजातानंच त्यांना घरी बोलावून घेतलं. अमृताचा एवढा जास्त नंबर असताना फक्त अडीच नंबर आहे असं तुम्ही का सांगितलंत, असं विचारल्यावर तिचे वडील वैतागल्यासारख्या सुरात म्हणाले, ""अहो, तीन-तीन मुली आहेत मला. मी कोणा-कोणाचं काय-काय लक्षात ठेवू!'' एवढंच नाही तर पुढे असंही म्हणाले, की आम्ही काहीही सांगितलं असेल; तुम्ही त्यावर विश्‍वास कसा ठेवलात? चौकशी करायची होतीत तेव्हाच! त्यांचं हे वक्तव्य ऐकून ती हतबद्धच झाली. आता बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. तेव्हा ती म्हणाली, की आता यातून मार्ग काय? तर अगदी निर्विकारपणे ते म्हणाले, की आता आहे तसं दोघांनी निभावून न्यायचं, नाही तर वेगळं व्हायचं! स्वतःच्या मुलीचं आयुष्य एखादा माणूस इतक्‍या निगरगट्टपणे पणाला लावतो आणि त्याबद्दल त्याला जरासुद्धा अपराधी वाटत नाही आणि हे सगळं आपल्यासमोर प्रत्यक्ष घडतंय हे सगळंच सुजाता आणि अ निकेतसाठी अतिशय धक्कादायक होतं.आता घटस्फोटाशिवाय पर्याय नाही हे बुद्धीला पटलं होतं; पण ती वेळ येऊ नये अशीच मनापासूनची इच्छा होती. त्यातून असा विचार पुढे आला, की त्यांच्याच डॉक्‍टरांना भेटून एकदा विचारावं. बघू या ते काही मार्ग सुचवू शकतात का! म्हणून मग अमृताकडून त्यांचं नाव माहीत करून घेऊन अनिकेत त्यांना भेटला. आधी एकदम ते काही सांगायला तयार होईनात; पण अनिकेतनं त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. मग मात्र त्यांनी पूर्ण सहकार्य केलं; पण त्यांनी आधीच्या माहितीत जी भर घातली त्यानं उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फिरवलं. ते म्हणाले, ""चष्मा घालूनही तिला जेमतेम दहा-बारा फुटांपर्यंतच दिसू शकतं. शिवाय गाडी चालवणं आणि कॉ म्प्युटरवर काम करणं हे काहीच ती करू शकणार नाही. तिला जड उचलून चालणार नाही. कधीही येऊ शकणाऱ्या अंधत्वाची टांगती तलवार सतत डोक्‍यावर बाळगूनच तुम्हाला आयुष्य काढावं लागणार. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दोष तिच्यात जन्मजातच आहे आणि तो अनुवांशिकसुद्धा आहे. या सगळ्याची मी अ मृताच्या बाबांना पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांनी तुम्हाला हे सर्व लग्नापूर्वी सां गायलाच हवं होतं.''आता मात्र घटस्फोटाशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही हे नक्की झालं; पण आता अ मृतानं एक वेगळाच प्रश्‍न निर्माण केला. तिचं म्हणणं असं होतं, की माझा नंबर खूप जास्त आहे याव्यतिरिक्त मलाही बाकी काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे आपली फ सवणूक तिच्या वडिलांनी केलीय. ती निर्दोषच आहे आणि ती आहे तसा तिचा स्वीकार करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असं अनिकेतसारख्या सज्जन, सरळ मनाच्या मुलाला वाटायला लागलं. घटस्फोटाचा विचार करणं हे अपराधीपणाचं वाटायला लागलं. त्याचबरोबर तिचा स्वीकारही करणं अवघड वाटायला लागलं. आता मात्र सुजाता पार खचून गेली. पाच-सहा वर्षांपूर्वी तिचा नवरा गेला आणि नंतर कौटुंबिक आघातांची मालिकाच सुरू झाली. त्यातून ती आ णि अनिकेत अगदी तावून-सुलाखून बाहेर पडले होते. आता नव्या सुनेच्या साथीनं चांगल्या वेगळ्या आयुष्याला सुरवात करायची म्हणून मोठ्या उत्साहानं, उमेदीनं पाऊल टाकलं आणि वाट्याला आली जीवघेणी फसवणूक! त्याचे परिणाम आता कुठपर्यंत जाणार आहेत, या सगळ्यालाच आपण कसं तोंड देणार आहोत... तिच्यापुढचे प्रश्‍न काही संपतच नव्हते.पण तिला हातपाय गाळून चालणारच नव्हतं. तिनं अनिकेतला खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं समजावलं, की अमृता खोटं बोलतेय. पंचवीस वर्षांच्या मुलीला आपण नंबर नक्की किती आहे हे माहिती नसणं शक्‍यच नाही. तुझा साधा सरळ स्वभाव तिनं ओळखलाय. त्यामुळे ती तुला "इनोशनल ब्लॅकमेल' करू पाहतेय आणि तिचं म्हणणं खरं आहे असं धरलं तरी ती आता ज्या स्थितीत आहे ते तिचं दुर्दैव आहे. माणूस म्हणून तुला तिच्याबद्दल सहानुभूती वाटणं बरोबर आहे; पण म्हणून त्याची किंमत तुझी काहीही चूक नसताना तू चुकवणं हा तरी कुठला न्याय? लग्नानंतर तिला काही आजार झाला असता, तर ती जबाबदारी नक्कीच तुझी होती; पण लग्नापूर्वीच्या कुठल्याही गोष्टीला तू जबाबदार नाहीस. तुझ्यासारख्या धडधाकट, निर्व्यसनी, सज्जन, सर्व दृष्टीनं सक्षम आणि सुस्थित मुलाला तशीच मुलगी मिळणं हा तुझा हक्क आहे. नैतिकतेच्या चुकीच्या कल्पनेला बळी पडून आयुष्यभरासाठी तिचा स्वीकार करणं हे तुझ्या दृष्टीनं सरळ सरळ आत्महत्या करण्यासारखं आहे हे वास्तव त्याला पटवावं लागलं. त्याच्या मनातली अपराधीपणाची भावना काढावी लागली.यथावकाश त्याला घटस्फोट मिळाला. कायद्याप्रमाणे त्यानं जे काय पैसे, दागिने अमृताला द्यायचे ते दिले तेव्हा एक गोष्ट मात्र मनात आली, की ज्याची फसवणूक झालीय त्यालाच वर पैसेही द्यावे लागतात याला न्याय म्हणायचं का? आणि घेणाऱ्या ंना तरी ते घेताना काहीच कसं वाटत नाही?आता दोघंही बरीच सावरली आहेत. मित्रमंडळी, नातेवाईक- सगळेच त्याला सांगतायत, की तू झालं ते सगळं एक वाईट स्वप्न होतं, असं समजून विसरून जा आ णि पुन्हा लग्न कर. तुला एखादी सुयोग्य मुलगी सहज मिळेल. तो मुली बघायला तयारही झालाय. पण... हा पणच इतका मोठ्ठा आहे! कितीही ठरवलं तरी आता स मोरच्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवणं अवघडच जातंय. जे समोर दिसतं आणि दाखवलं जातं त्यावर विश्‍वास ठेवून पुन्हा आयुष्याची बाजी लावायची का? आणि पुन्हा फ सवणूक पदरात पडली तर? पण नाही तर दुसरा मार्ग तरी

Friday, October 2, 2009

राष्ट्रपिता महात्मा गांधी

हुशार मुलांची तुलना ते कधीच इतरांबरोबर करत नसत. विद्यार्थ्यांवर ते पूर्ण विश्‍वास टाकत. परिक्षा चालू असताना विद्यार्थ्यांवर ते कोणताही पहारा ठेवत नसत. लहानात लहान मुलालाही आपण कोणीतरीकाशी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात महात्मा गांधी म्हणाले होते, ""शिक्षण फक्त चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी नसते तर माणसाने आयुष्यभर ताठ कण्याने वावरावे, जगताना शूर सैनिक असावे आणि समाजात ताकदीने पूर्ण शक्तीने वावरावे यासाठी असते. शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुलांनी अभ्यास करावा. त्यांचे जगणे कसे सुधारेल हे पहावे. लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेचे प्रबोधन करण्याची गरज आहे.''ही गोष्ट आहे गांधीजी शाळेत असतानाची. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे शाळेत शिकत असतानाच त्यांचे लग्न झालेले होते. त्यांना शाळेत एक मित्र मिळाला होता. खरे तर तो त्यांच्या मोठ्या भावाचा मित्र होता. ते दोघे वर्गमित्र होते. हा मित्र गांधीजींना अतिशय विश्‍वासू वाटत होता. खरे तर त्याच्या काही सवयी आणि वागणे कानावर आल्यामुळे आई, मोठा भाऊ एवढेच नव्हे तर गांधीजींच्या पत्नीनेही त्यांना सावध केले होते. त्या मित्राची संगत चांगली नसल्याचे सांगितले होते. त्यावर गांधीजींना आईला आणि भावाला सांगितले, ""मला माहीत आहे की तुम्ही सांगितलेले काही दुर्गुण त्याच्यात आहेत. पण त्याच वेळी त्याच्यातील चांगल्या गुणांची तुम्हांला कल्पना नाही. त्याला सुधारण्यासाठीच मी त्याच्याशी मैत्री केलेली आहे आणि तो सुधारला तर त्याच्याइतका चांगला माणूस भेटणार नाही, असा मला विश्‍वास आहे. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका.'' परंतु त्याच वेळी गांधीजींच्या मनाच्या एका कोपऱ्यात आपले चुकत असल्याची भावना होती. ज्याच्यात सुधारणा घडवून आणायची आहे, त्याच्याशी अत्यंतिक जवळून ठेऊन ते काम होत नाही, याची त्यांना कल्पना होती. एके दिवशी त्यांच्या या मित्राने गांधीजींना सांगितले, की त्यांचे अनेक शिक्षक लपूनछपून मांसाहार करतात आणि दारूही पितात. शाळेतील काही मुलेही त्यांच्यात सहभागी असल्याचे त्याने सांगितले. त्यावर निरागस मनाच्या मोहनदासला आश्‍यर्च वाटले आणि दुःखही झाले. त्यांनी मित्राला याबाबत विचारलेही. त्यावर मित्राने हुशारीने सांगितले, ""आपण दुर्बल आहोत कारण आपण मांस खात नाही. ब्रिटिश लोक मांस खातात म्हणून आपल्यावर राज्य करतात. मी एवढा काटक आणि वेगाने का पळू शकतो माहीत आहे का, कारण मी मांसाहार करतो. मांसाहार करणारी व्यक्ती पडली तरी तिला फारसे लागत नाही. लागले आणि जखम झालीच तर ती लवकर बरी होते. आपले शिक्षक आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती मांसाहार करतात ते काही मूर्ख नाहीत. तू पण एकदा मांसाहार करून बघ. एकदा खाऊन बघायला काय हरकत आहे? तुझ्या लक्षात येईल की त्यामुळे काय शक्ती मिळते.''अर्थात त्याने एकदा सांगितले आणि गांधीजी मांसाहार करायला लागले असे घडले नाही. प्रत्येक वेळेला तो मित्र वेगवेगळी उदाहणे देऊन गांधीजींनी प्रभावित करण्याच प्रयत्न करत असे. तो मित्र वेगाने खूप अंतर पळू शकतो. लांब उडी, उंच उडी मारू शकतो. पुन्हा शिक्षकांनी त्याला कितीही कडक शिक्षा केली, मारले तरी तो हूं की चूं करत नाही हे ते पाहत होते. त्याच वेळी ते स्वतःच्या शरीराकडे ते पाहत. तुलनेत त्यांची शरीरयष्टी अगदीच शिडशिडीत होती. त्यांच्या मनात येत असे, आपल्याला नेहमीच चोरांची, भुताची, अंधाराची भीती वाटते. अंधारात आपण एकटे जाऊ शकत नाही, रात्री अंधाऱ्या खोलीत एकटे झोपू शकत नाही. सापांची आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांची आपल्याला भीती वाटते, असे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू होते. त्यामुळे धष्टपुष्ट आणि धीट होण्यासाठी त्यांनी मांसाहार करून पाहण्याचे ठरवले. गांधी घराणे वैष्णव. त्यांच्या घराण्यात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. त्यामुळे घरात ही गोष्ट कळली तर आईवडिलांना सहन करता येणार नाही एवढा धक्का बसेल, ही वस्तुस्थिती गांधीजींना माहिती होती. तरीदेखील ताकदवान आणि धाडसी होण्याच्या कल्पनेने त्यांना पछाडले असल्यामुळे त्यांना आईवडिलांची भीती वाटत नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर मांसाहार केला पाहिजे हे त्यांच्या मनावर ठसले होते. मग एके दिवशी त्यांच्या मित्राने नदीच्या किनारी मांसाहारी जेवणाची सगळी व्यवस्था केली. त्या वेळी ते मांस अतिशय कडक लागल्यामुळे गांधींना ते आवडले नाही आणि ते न खाताच परतले. तेवढ्या घटनेने रात्री त्यांना झोप आली नाही. हे प्रकरण एवढ्यावर थांबायला हवे होते. पण तो मित्र फारच चिकाटीचा होता. पुढच्या वेळेला त्यांना शासकीय विश्रामगृहात जेवणाची तयारी केली. सर्व पदार्थांची चांगली मांडामांड केली, सजावट केली- जेणेकरून पाहणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटावे. मग असे जेवण करून आल्यावर गांधीजी घरी काहीतरी थाप मारून जेवणार नसल्याचे सांगत. वर्षभरात अशी पाच-सहा जेवणे झाली. कारण त्या मित्राकडे नेहमी असे जेवण करण्यासाठी तेवढे पैसे नव्हते. आपण मांसाहार करतो ही गोष्ट आईवडिलांना समजली तर त्यांना मोठा धक्का बसेल, याची गांधीजींना कल्पना होती. त्याचे गांभीर्य समजल्यावर त्यांनी मांसाहार वर्ज्य करण्याचे ठरवले आणि तसे मित्रांना सांगितले. नंतर आयुष्यात पुन्हा कधीही त्यांनी मांसाहार केला नाही.त्याच वेळी त्यांना सिगारेट ओढण्यात शौर्य वाटू लागले होते. सिगारेट ओढण्यातून काही आनंद मिळतो म्हणून नव्हे तर तोंडातून धूर सोडण्यातील गमतीसाठी ते आणि त्यांचा एक नातेवाईक मिळून सिगारेट ओढत असत. त्यांचे काका सिगारेट ओढत असत आणि त्यांना पाहून त्यांची नक्कल ही दोन मुले करत असत. अर्थात सिगारेट विकत आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे काकांनी फेकून दिलेली थोटके गोळा करून ते ती ओढत असत. परंतु त्यातून फारसा धूर निघत नसे. मग सिगारेट खरेदी करण्यासाठी ते घरातून पैसे चोरू लागले. परंतु लवकरच त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात आला आणि हे सगळे बंद केले. हे सगळे ते तेरा-चौदा वर्षांचे असताना घडले. त्यांच्याबरोबर त्यांचा एक भाऊदेखील मांसाहार करू लागला होता. नंतर त्याने या सवयीमुळे उधारी करून ठेवली. ती त्या काळात पंचवीस रुपये एवढी होती. गांधीजींनी या भावाचे सोन्याचे कडे चोरून त्याची उधारी भागवली. परंतु या घटनेने त्यांचे मन त्यांना खाऊ लागले. त्याचबरोबर आपण आईवडिलांच्या नकळत मांसाहार करत होतो, सिगारेट ओढत होत यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. या सगळ्याचे प्रायश्‍चित्त घेण्याचे त्यांनी ठरवले. हे सगळे वडिलांना सांगून मोकळे व्हावे असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी मोठे धाडस करून त्यांनी आपल्या सर्व चुकीच्या कृत्यांची माहिती एका कागदावर लिहिली आणि थरथरत्या हाताने वडिलांना तो कागद दिला. त्यांनी ती वाचली आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनाला तीव्र वेदना होत होत्या आणि त्या त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आता ते कडक शिक्षा करतील, असे गांधींजींना वाटले होते. वडिलांनी तो कागद फाडून टाकला. ते गांधीजींना म्हणाले, तुला तुझी चूक कळली हेच तुझे प्रायश्‍चित्त. गांधींच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. या घटनेने माझे डोळे उघडले, असे ते म्हणाले. मी जर चित्रकार असतो तर त्या घटनेचे चित्र काढून दाखवले असते, असे ते म्हणाले. गांधीजी आयुष्यात नंतर महान कार्य करू शकले, सत्याग्रह आणि अहिंसेच्या जोरावर ब्रिटिश सत्तेला वाकवू शकले त्याचे मूळ या घटनेत आहे.शिक्षण आणि गांधीजीगांधीजी शारीरिक शिक्षेच्या विरुद्ध होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी फक्त एकदा एका मुलाला छडीने मारले होते. त्या वेळी लगचेच त्यांचा अंतर्बाह्य थरकाप झाला होता. ते अस्वस्थ झाले होते ते स्वतःवरचा ताबा गेल्यामुळे. त्या मुलाने गांधीजींकडे पुन्हा पुन्हा क्षमा मागितली, ती माराच्या दुःखामुळे नव्हे तर आपण गांधीजींच्या मानसिक शांतीला धक्का लावला याचा त्याच्या मनाला घोर लागल्यामुळे. विद्यार्थ्यांनी खेळात भरपूर चढाओढ करावी, स्पर्धा करावी असे ते म्हणत. शिक्षणातील स्पर्धा मात्र त्यांना मान्य नव्हती. आश्रमातील आहोत असे वाटले पाहिजे, असे ते म्हणत. शिक्षण घेऊन जर मुले स्वतःच्या हाताचा वापर करणे विसरत असतील किंवा शारिरीक श्रमाचे काम करण्याची त्यांना लाज वाटत असेल तर निरक्षर राहून त्यांनी दगड फोडण्याचे काम केले तरी चालेल, असे त्यांचे मत होते. त्यांनी त्यांच्या नातवाला कापूस कसा तयार होतो, सुतापासून कापड कसे विणले जाते, धागे कसे मोजतात, हे सगळे समजावून सांगितले होते. उत्तम हस्ताक्षर हा शिक्षणाचा एक भाग आहे, असे ते मानत. त्यांना स्वतःच्या वाईट हस्ताक्षराची लाज वाटत असे. ते शिक्षकांना सांगत, ""मुलांना आधी रेघा, कंस, त्रिकोण, पक्षी, फुले, पाने यांची चित्रे काढायला सांगा म्हणजे मग ती चांगल्या अक्षरात लिहू शकतील.''-

Thursday, October 1, 2009

सहलीच्या आनंदासाठी...

दूधवाला, पेपरवाला, फुलपुडीवाला किंवा रोज घरी सेवा पुरवणाऱ्या इतरांना किती दिवस घर बंद राहील, ह्याची निश्चित मदेऊ नका. उद्यापासून नको. परत कधी ते नंतर सांगेन. एवढा संवाद पुरे. दरवाजावर नोटीस लावू नका. तुमच्या घराजवळचे मित्र किंवा नातेवाईक ह्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक शेजारी अवश्य देऊन ठेवा. निघताना कितीही घाई झाली तरी डोके शांत ठेवून गॅस, पाणी, वीज आणि खिडक्या बंद कराव्यात. एकदा सहल सुरू झाल्यावर थोडी जरी शंका आली तरी सहलभर ते ओझे वाहावे लागते. एक चावी शेजारी अवश्य द्या. दागदागिने, रोकड शक्यतो बँक लॉकरमध्ये ठेवा. कपाटाच्या चाव्या कोठेतरी लपवू नका. ठरलेल्या ठिकाणीच ठेवा. मोबाईलमध्ये नंबर असतातच परंतु उतरल्यावर हॉटेल, वाहनचालक, तेथील संबंधित आणि नातेवाईकांचे फोननंबर वेगळ्या वहीत टिपून ठेवा. तुम्ही ज्या ज्या वाहनातून प्रवास कराल त्यांचे नंबर टिपून ठेवा. सहलीत रस्ता चुकलात तर पोलिस, पोलिस स्टेशन, सरकारी कार्यालये यांची नि:शंक मदत घ्या. तिथली प्रादेशिक भाषा पूर्ण येत नसेल तर ती तोडकीमोडकी बोलू नका. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. तेथील राजकारण आणि नेत्यांसंबंधी बोलणे टाळा. ज्या हॉटेलात उतराल त्याचे कार्ड सर्वांना खिशात ठेवायला द्या. शिवाय, स्वत:चे फोटो ओळखपत्र जवळ बाळगा. साध्या कपड्यात पानाच्या किंवा पेपर स्टॉलवर गेलात, तरी ते जवळ ठेवा. खिशात सहज बाळगता येईल, अशी छोटी बॅटरी जवळ ठेवा. सुट्टे पैसे नेहमी खिशात ठेवा. तिकिटे, बुकिंग यांच्या झेरॉक्स खिशात ठेवा. इंटरनेटरवर माहिती असते. पण बरोबर घेऊन जा. काही ठिकाणी ती नसतात परंतु कोठूनही ती तुमच्या मोबाईलवर रिचार्ज होऊ शकतात. त्या प्रदेशातील सणवारांची माहिती मिळवा. कारण एखादा सण स्थानिक पातळीवर इतका महत्त्वाचा असतो की त्या दिवशी सर्व व्यवहार बंद असतात. तुमच्या बरोबरच्या सर्व सदस्यांचे मोबाईल नंबर एकमेकांच्या मोबाईलवर सेव्ह करून टाका. कधी त्याचा उपयोग करावा लागेल, सांगता येत नाही. स्थानिक ठिकाणावरून बस सेवा, रेल्वे सेवा ह्यांची माहिती अधिकृत केंदावरूनच मिळवा. कारण स्थानिक रहिवाशांकडे ती अद्ययावत असतेच असे नाही. ज्याला विचारले तो अंदाजपंचे सांगून मोकळा होऊ शकतो. गावांची नावे नीट लक्षात ठेवा. कारण एकाच नावाची दोन-तीन गावे असू शकतात. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ उडू शकतो. सूचनांची मोठी यादी एवढ्यासाठीच की तुम्ही स्वनियोजित सहलीला जात असाल तर ह्यातील प्रत्येक गोष्ट सोयीची आहे. तुमचा प्रवास आणि सहल आनंदी करायची असेल तर वरील गोष्टी कटाक्षाने नुकत्याच गेलेल्या पर्यटकाकडून प्रत्यक्ष माहिती घ्या. सर्वच शहरांमध्ये रस्ते, पूल, इमारती यांच्यात सतत बदल होत असतात. तेथे भरलेल्या पाकिटाचे प्रदर्शन करीत फिरू नका. पाकिटमाराचे काम सोयीचे आणि अर्थपूर्ण व्हावे म्हणून खास टेहळणीसाठी एका चोराची नियुक्ती केलेली असते. मोबाईलची रिचार्ज कूपने पाळता येतील. कधी कधी अगदी क्षुल्लक गोष्टींनी सहलीचा विचका होतो. तसे होऊ नये, याच मनापासून शुभेच्छा! शुभास्ते पंथान: सन्तु।

Tuesday, September 29, 2009

मार्ग यशाचा

चे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीच उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळू शकते. त्यासाठी आपण सआपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वार्वप्रथम "मला हे जमणार नाही, अशक्‍य आहे, नकोच' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामाला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरू तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे. चंदूला या गोष्टीचे खूप आश्‍चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, ""नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते?'' यावर नंदूने त्याला सांगितले, ""अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते.''तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीच उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळू शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम "मला हे जमणार नाही, अशक्‍य आहे, नकोच' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्‍य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ती हे तरुण वक्ते तरुणांना कायम सांगतात "इम्पॉसिबल' (अशक्‍य) या इंग्रजी शब्दाची फोड करा. i m possible- आय एम पॉसिबल्‌ अशी! म्हणजेच इम्पॉसिबल या शब्दातच पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला "आय' फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. "आय' म्हणजे - "मी.' मला शक्‍य आहे. "फक्त मलाच शक्‍य आहे,' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.सकारात्मक विचारांचा वसा -प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली? का झाली? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करू शकतो.पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम -म्हणजेच स्वतःबद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्‍वास असणे. स्वतःच्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्‍वास असणे आणि स्वतःचे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्‍या चांगल्या प्रकारे करू शकतो, तेवढा कोणीच करू शकत नाही. मला काय येते? मी काय करू शकतो? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.यशाचे समीकरण - यश = चिवट झुंज + अथक प्रयत्न + परिपूर्णतेचा ध्यास कामातील सुटसुटीतपणा, टापटीप, सुंदरता, नेटकेपणा, परिपूर्णता समोरच्या व्यक्तीला कायमच आकर्षित करीत असतात.यशस्वी माणूस कायम वेळेलाच सर्वांत जास्त महत्त्व देत असतो. मग ती वेळ स्वतःची असो वा दुसऱ्यांची. कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीला प्राध्यान्यद्यावे, हे यशस्वी व्यक्तीला बरोबर कळते.यश हवे असेल तर यशाच्या काही पायऱ्या आपल्याला चढायला हव्या.१) "अशक्‍य' हा शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचा हद्दपार करणे. २) सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारांची मनाला सवय लावणे. ३) उत्तम श्रोता होणे. ४) "परफेक्‍शन' - "परिपूर्णता' या गोष्टीचा ध्यास घेणे. ५) प्रगतिशील दृष्टिकोन ठेवून, यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहाणे. ६) स्वतःचे सामर्थ्य ओळखून त्यानुसार वाटचाल करणे. ७) चिकाटी, निश्‍चय, जिद्द आणि धैर्य आत्मसात करणे. ८) स्वतःच्या व इतरांच्या वेळेचे महत्त्व जपणे व कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे, हे अचूक ओळखणे. ९) उन्मत्तपणा, आळशीपणा, असमर्थता या गोष्टींना फाटा देऊन, प्रयत्नशीलता, उदारता, नम्रता या गोष्टी आत्मसात करणे.आपण सर्वांनीच हे कायम लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्याला आयुष्यात सोन्याची संधी मिळेलच असे नाही. पण आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे हे फक्त आपल्या आणि आपल्याच हातात असते. उगवणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी नवीन संधी असते, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

पैसा... पैसा...पैसा...

बऱ्याच जणांच्या डोक्यात 'पैसा = करिअर' असं समीकरण पक्क असतं. परंतु हे पूर्णसत्य नाही. करिअर म्हटलं की पैसा आला
च. परंतु फक्त पैसा म्हणजे करिअर नव्हे हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं आणि ते मुलांच्या मनावरही बिंबवायला हवं. करिअर म्हणजे उत्तम रितीने जगणं, आपले छंद जोपासणं, समाजासाठी काहीतरी करणं, पुस्तकं वाचणं, चांगले चित्रपट, नाटक, कार्यक्रम पाहणं, कुटुंबासोबत वेळ (चांगला) घालवणं. नोकरी किंवा व्यवसाय करताना पैसा मिळवावा. याचा अर्थ असा नाही की पैशांच्या अभावात जगावं. परंतु म्हणून आयुष्यावर पैशांचा प्रभाव पडू देऊ नका. पैशांपेक्षाही अधिक चांगल्या आणि 'मौल्यवान' गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. आजच्या काळात बरेचजण पैशांचा विचार करतात. त्याच्यामागे ऊर फुटेस्तोवर धावतात. परंतु अशावेळी प्रत्येकाने आपल्याला किती पैसा हवा आहे, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. त्यानुसार आपल्या करिअरची आखणी करावी. कारण पैसा जितका कमवाल तितका तो कमीच असतो. त्यामुळे त्याच्या सीमारेषा आपणच आपल्या ठरवायला हव्यात. त्याबरोबरच आपल्या छंदांना, कुटुंबीयांना आणि आवडत्या इतर गोष्टींना आपण किती वेळ देणार आहोत याचाही विचार करायला हवा. आता तुम्ही मला विचाराल की याचा आणि करिअरचा काय संबंध? संबंध आहे. मागच्या काही लेखांमध्येही मी हे तुम्हाला सातत्याने सांगतोय. वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध तुमच्या करिअरशी आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी आहे. उदाहरणच द्यायचं तर, समजा एखाद्या माणसाला फिरण्याची खूप आवड आहे. परंतु तो त्याच्या व्यवसायामुळे किंवा ऑफिसातल्या कामांमुळे फिरायला बाहेर जाऊच शकला नाही तर काम करताना त्याचं मन त्या कामात लागत नाही. ते दूर कुठल्यातरी माळरानावर किंवा पर्वतांवर गेलेलं असतं. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होतो. हेच जर तो फिरायला गेला. सहाजिकच तो रूटिनमधून थोडा फ्री होऊन रिफ्रेश होतो. मग तो आपल्या कामावर पूर्ण एकाग्र होऊन जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. त्यामुळे पालकांनो आणि मुलांनो, आपले छंद जोपासा, खूप वाचा, फिरायला जा, चर्चा करा आणि सोबत मार्क्ससाठी लागणारा अभ्यासही भरपूर करा. कारण शिकणं ही तर आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे!

Thursday, September 24, 2009

महर्षी

एके दिवशी महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात मुले अभ्यास करत असतात. त्या वेळी महर्षी म्हणतात, ""आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायची आहे.''महर्षी गोष्ट सांगायला लागतात ः एका राज्यात दोघे व्यापार करायचे. एकाचे नाव होते कुबेर आणि एकाचे फलिन. कुबेर सगळ्यांवर विश्‍वास ठेवायचा; पण फलिन मानायचा, की कोणावरही विश्‍वास ठेवणे हा वेडेपणा आहे.एके दिवशी कुबेर त्याच्या मुलाला घेऊन व्यापारासाठी बाहेरगावी गेला होता. तेथे त्याला राजाने बोलावून घेतले; पण त्याचा मुलगा त्याच्याच बरोबर होता म्हणून त्याने आपल्या दोन नोकरांना त्याच्या मुलाला घरी सोडण्याचे काम दिले. त्या दोघा ंचे नाव सबल व विमल होते. ते दोघेही कुबेरच्या मुलाला घरी सोडण्यास निघाले. बरोबर कुबेरने खूप पैसे दिले होते. वाटेत मोठे जंगल लागले. त्या दोघांनी विचार केला, की हा मुलगा छोटा आहे. म्हणून आपण या मुलाला इथेच जंगलात सोडू आणि सगळे पैसे घेऊन पळून जाऊ. मग नंतर त्यांनाच पश्‍चात्ताप होऊ लागला, की आपले मालक आपल्यावर खूप विश्‍वास ठेवतात आणि इथे आपण त्यांचा विश्‍वासघात करत आहोत, असे म्हणून त्यांनी मुलाला सुखरूप घरी पोचवले व पै सेही त्याच्या आईकडे दिले. महर्षी दोन मिनिटे शांत बसतात व म्हणतात, ""आता दुसऱ्या व्यापाऱ्याची गोष्ट ऐका!''एके दिवशी फलिनने त्याचा नोकर कणकला बोलाविले आणि सांगितले, ""बाजूच्या गावात व्यापार खूप चांगला चालेल. तू तेथे जाऊन व्यापार कर, मी पाच दिवसांत येतच आहे.'' कणक सगळे सामान घेऊन निघाला. खरंच, तेथे व्यापार चांगला चालत होता. कणकने विचार केला, की आपण सगळा माल स्वस्त किमतीत विकू व नंतर चौथ्या दिवशीच पळून जाऊ. जसा तो म्हटला, तसे झाले. चौथा दिवस उजाडला आणि पाहतो तर काय फलिन तेथे हजर होता. कणकने मालकाला विचारले, ""तुम्ही तर उद्या येणार होता. मग आजच का आलात?'' फलिन म्हणाला, ""मी येणार तर आजच होतो; पण मी तुला उद्या सांगितले.'' अशामुळे फलिन नुकसानीत जाण्यापासून वाचला. महर्षी म्हणाले, ""या गोष्टीचे काय तात्पर्य?'' हे ऐकून सगळी मुले चूप बसली. तेव्हा महर्षी म्हणाले, ""कोणावरही डोळे मिटून विश्‍वास ठेवू नये. कोणावरही मर्यादित प्रमाणातच विश्‍वास ठेवावा.

Tuesday, September 22, 2009

कर्मवीर भाऊराव पाटील

इंग्रजी सहावीत नापास झाल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. तीच त्यांच्या जीवनाची सुरवात होती. कर्मवीर भाऊराव पाटील सामजिक परिस्थिती विषयी अतिशय संवेदनशील होते. इथल्या अनेक समस्यांवर शिक्षण हाच उपाय आहे हे त्यां नी ओळखले. त्यातूनच ग्रामीण भागातील समाजासाठी त्यांनी शिक्षणप्रसाराची चळवळ सुरु केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करुन तळागाळातील स माजासाठी ज्ञानाची दारे खुली केली.वर्गमित्र आत्मारामपंत ओगल्यांच्या काच कारखान्यात भाऊराव पाटील नोकरीला होते, त्या वेळची ही गोष्ट. हा कारखाना तेव्हा किर्लोस्करवाडीला होता. हाती घेतलेले काम सर्वस्व झोकून पूर्ण करायचे, ही त्यांची खासीयत. सचोटी, परिश्रम व चिकाटी या गुणांच्या जोरावर त्यांनी कारखान्याची भरभराट करून दाखवली. त्यांचे काम पाहून लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ओगल्यांकडे भाऊरावांची मागणी केली. मग भाऊराव त्यांच्याकडे काम करू लागले. उत्पादन वाढले, विक्री वाढली, त्यात भाऊरावांचा मोठा वाटा होता. नांगराची विक्री करताना ते अक्षरशः तहानभूक विसरून जायचे. शेतकरी, व्यापाऱ्यांना लोखंडी नांगराचे महत्त्व पटवून द्यायचे. प्रस ंगी स्वतः शेतात नांगर चालवून दाखवायचे. त्यामुळे भाऊरावांचा पगार वाढला. त्या काळी सोन्याचा भाव होता वीस रुपये तोळा. आणि दोन रुपयाला पोतंभर ज्वारी मिळायची. तेव्हा भाऊरावांचा मासिक पगार होता नव्वद रुपये. विक्रेता म्हणून काम करताना त्यांनी खूप पायपीट केली. ग्रामीण भागातील बहुजन समाजाची दुःखे जवळून पाहिली. त्यांच्या अज्ञानाचा कसा गैरफायदा घेतला जातो आहे, अंधश्रद्धा आणि जातीपातींमध्ये तो कसा अडकला आहे, हे त्यांनी पाहिले. गरीब, अस्पृश्‍य, मजूर यांची जगण्यासाठीची केविलवाणी धडपड त्यांनी बघितली. जन्मापासून मृत्यूपर्यंत धर्माच्या नावाखाली त्याला कसे लुबाडले जाते, हे त्यांनी पाहिले. या गुलामीतून त्यांची मुक्तता कशी होईल, अंधश्रद्धा कशा दूर होतील, त्यांच्या पोटात चार घास कसे पडतील, असे प्रश्‍न त्यांना सतावू लागले. यावर एकच उत्तर आणि ते म्हणजे शिक्षण, हे त्यांनी जाणले आणि त्या कार्यात पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला.कष्टांची लाज न वाटणे, कोणतेही काम कमीपणाचे किंवा प्रतिष्ठेचे न मानणे, आपल्या गरजा कमीत कमी करणे, खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणे, चारित्र्य, सेवा, देशप्रेम, त्याग यांसारख्या गुणांची जोपासना करण्याचे काम कर्मवीर अण्णा वस तिगृहात जाणीवपूर्वक करत. पैशावाचून गरिबाचे शिक्षण अडू नये, बहुजन स माजातील मुलेही बुद्धीने हुशार असतात, याची त्यांना जाणीव होती. शिक्षण आणि वसतिगृहातील सहजीवनातून जातपात संपेल, असा विश्‍वास त्यांना वाटत होता. त्यामुळेच विरोध असतानाही त्यांनी सर्व जातिधर्मांची मुले वसतिगृहात एकत्र ठेवली होती. वसतिगृहात त्यांनी "कमवा शिका' योजना सुरू केली. केवळ पुस्तकी विद्वान न बनता, व्यावहारिक शिक्षणाची जोड मुलांच्या आयुष्याला मिळाली. या योजनेत मुलांना शेतीची सर्व कामे करणे, जनावरे सांभाळणे, मुरुम खोदणे, खडी फोडणे, सुतार, गवंडी अशा कारागिरांच्या हाताखाली मुलांना काम करावे लागे. विटा तयार करणे, विहीर खोदणे अशीही कामे करावी लागत. ही कामे करूनही नियमित अभ्यासात मुले कुठेही कमी पडू नयेत याबाबत ते दक्ष असत. कष्टांची कामे केल्यामुळे बुद्धीवर किंवा यशावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे कर्मवीरांच्या वसतिगृहात राहून तयार झालेला विद्यार्थी अशा गुणांची श्रीमंती घेऊन बाहेर पडत असे. त्यामुळे ते समाजात उठून दिसत. त्यातून कर्मवीरांच्या कार्याकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. १९२४ मध्ये एक विद्यार्थी घेऊन त्यांनी वसतिगृह सुरू केले होते. पुढे वाढत वाढत वसतिगृहांची संख्या सत्तर -ऐंशीपर्यंत गेली. त्याचबरोबर त्यांनी खेडोपाडी शाळा सुरू करण्याचा ध्यास घेतला होता. त्यात अनेक अडचणी आल्या. गावाला शाळेची गरजच काय, इथपासून लोकांचे प्रश्‍न सुरू होत. अनेक गावांमध्ये शाळा सुरू करावी की नको, या विषयावर लोक देवाला कौल लावत.अशा वेळी कधीकधी कर्मवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खोटेपणा करावा लागे. अनुकूल कौल लावून घेतल्यावर शाळा सुरू करता येत असे. अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी ते चालत गेले, कधी बै लगाडीने गेले. प्रसंगी घोड्यावरून गेले. सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात त्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या. १९५० पर्यंत त्यांनी सातारा-कोल्हापूर परिसरात सुरू केलेल्या शाळांची संख्या ५७८ वर गेली. बहुजन समाजातील मुले शिकू लागली होती. अनेक गावांत पत्र आले तर वाचून घेण्यासाठी दुसऱ्या गावातील वाचता येणाऱ्या व्यक्तीकडे जावे लागत असे. मणभर लाकडे फोडून दिल्यावर पत्र वाचून त्यातील मजकूर समजत असे. आता घराघरात ज्ञानाचा दिवा प्रकाशत होता. त्यामुळे पत्र वाचण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जाणे बंद झाले. एव्हाना संस्थेचे ना मकरण रयत शिक्षण संस्था असे झाले होते. १९४७ मध्ये त्यांनी साताऱ्यात महा विद्यालय सुरू केले. सगळ्या जाती-धर्मांच्या मुलांना घेऊन अण्णांनी शिक्षणप्रसाराचे काम सुरू केले होते. त्याच पद्धतीने सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्यांनी या महा विद्यालयाला दिले. देणगी घेऊन, पैशाच्या जोरावर हे नाव बदलण्यास त्यांनी ठाम नकार दिला. त्याचप्रमाणे बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या नावानेही त्यांनी साताऱ्यात हायस्कूल सुरू केले. अर्थात त्यासाठी कोणतीही मदत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळू शकली नाही. समाजातील कर्मकांड, अज्ञान, अं धश्रद्धा, धर्मभोळेपणा यावर सडकून टीका करत समाजाला शहाणे करण्याचे व्रत ज्या माहात्म्याने आयुष्यभर घेतले होते, त्या संत गाडगे महाराजांच्या नावाने त्यांनी १९५४ मध्ये कराडला महाविद्यालय सुरू केले. जो बहुजन समाज धार्मिक विधी आणि कर्मकांडांच्या ओझ्याखाली अज्ञानात वर्षानुवर्षे पिचत होता, त्या समाजाला अण्णांनी शिक्षणाची दारे उघडी करून दिली. एवढेच नव्हे, तर अठराविश्‍व दारिद्य्र असणाऱ्या कुटुंबांतील अनेक मुलांना त्यांनी आपल्या खांद्यावर बसवून वसतिगृहात आणले. त्यांची देखभाल केली. त्यांना अपार प्रेम दिले. शिक्षणाबरोबरच कष्टांचे संस्कार त्यांच्या मनावर केले. त्याचा परिणाम म्हणून धर्माच्या ग्लानीत पडलेला समाज जागृत झाला. नव्या महाराष्ट्राची उभारणी होत असताना अण्णांच्या मुशीतून घडलेल्या अनेक नामवंतांनी त्यात योगदान दिले.----------कर्मकांडांना विरोध आणि सडेतोड स्वभाव यामुळे भाऊरावांना शाळेत शिकत असताना कोल्हापुरातील वसतिगृह सोडावे लागले. त्यांच्या एका वर्गमित्राच्या मदतीने त्यांना शाहू महाराजांचे कृपाछत्र लाभले. तेथे त्यांना भरपूर खुराक मिळाला. त्यांची प्रकृती दणकट आणि मजबूत बनली. त्यांना कुस्त्यांची आवड लागली. कधी-कधी ते राजवाड्यातील मुलांबरोबर क्रिकेटही खेळत. एकदा बॅटिंग करताना त्यांनी सगळी ताकद लावून चेंडू टोलावला आणि राजवाड्याच्या खिडकीची काच फ ुटली. चेंडू इतका उंच आणि लांब जाईल याची कुणालाच कल्पना नव्हती. आता महाराज शिक्षा करणार म्हणून सगळी मुले घाबरली. सगळ्या मुलांना महाराजांसमोर उभे राहण्याची वेळ आली. महाराजांनी विचारले, ""क्रिकेट कोण खेळत होते?''""आम्ही राजवाड्यातील मुले,'' त्यातील धीट मुले म्हणाली.त्यावर प्रश्‍न आला, ""काचेवर कुणी चेंडू मारला?'' भाऊराव पुढे होऊन धीटपणे म्हणाले, ""महाराज खिडकीची काच मी मारलेल्या चेंडूमुळे फुटली. एवढा उंच चेंडू जाईल, असे मला वाटले नव्हते.''""म्हणजे तुझ्याकडून गुन्हा झाला आहे,'' महाराज म्हणाले.""होय महाराज, पण मुद्दाम नाही; चुकून घडले. जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे,'' भाऊराव म्हणाले.हे ऐकून महाराजांचा चेहरा फुलला. खरे बोलण्यावर ते खूष झाले आणि म्हणाले, ""तुला माझी भीती कशी वाटली नाही?''भाऊराव म्हणाले, ""त्यात कसली भीती? चूक झाल्यावर जे घडले ते खरे सांगायचे आणि मिळेल ती शिक्षा भोगायची.''त्यावर महाराज म्हणाले, ""तू खरे बोललास म्हणून तुला शिक्षा माफ. जा पळ आता.''-----------------लक्ष्मीबाईंची त्यागी वृत्तीसाताऱ्यातील धनिणीच्या बागेत वसतिगृह सुरू झाले होते. तिथे साठ-सत्तर मुले राहून काम करून शिकत होती. अनेकदा कर्मवीर देणग्या मिळवण्यासाठी बाहेर पडले, की चार-सहा दिवस परत येत नसत. तोपर्यंत एखाद्या वेळी वसतिगृहातील धान्य संपून जात असे. दुकानदार उधारीवर देत नसत. कारण पूर्वीची उधारी शिल्लक असायची. धान्याचा कण शिल्लक नाही म्हटल्यावर वसतिगृहाचा सेक्रेटरी व हिनींकडे म्हणजे अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाईंकडे येत असे. अण्णा आले का, विचारल्यावर नकारार्थी उत्तर मिळत असे. पण कशासाठी विचारल्यावर तो प रिस्थिती सांगायचा. मग त्या म्हणायच्या, ""असे कर, हा माझा दागिना घे; मोडून आलेल्या पैशाची ज्वारी आणा आणि स्वयंपाक करा.'' मग तो सेक्रेटरी जात असे आणि व्यवस्था करत असे. असे करता-करता लक्ष्मीबाईंनी त्यांच्याकडील ऐंशी- नव्वद तोळे दागिने विकले. गोरगरिबांची मुले शिकावीत म्हणून एवढा त्याग करणारी माउली दुसरी सापडणार नाही. सगळे दागिने संपल्यावर जेव्हा पुन्हा तशीच वेळ आली, तेव्हा भुकेल्या मुलांच्या तोंडाकडे पाहवत नाही म्हणून त्यांनी गळ्यातील मं गळसूत्र काढून पुडीत बांधून मोडण्यासाठी दिले. बहुजन समाजातील मुले शिकावीत, हा समाज अंधकारातून बाहेर पडावा, त्याने प्रगती करावी म्हणून या माउलीने केलेल्या त्यागाची तुलना करता येणार नाही.

जेव्हा माजी आमदार गेले 'रोहयो'च्या कामावर

वर्ष १९७२... दुष्काळ पडलेला आणि "ते' माजी आमदार होते; पण "आजी' असतानाही पदाची नशा नव्हती, तर आता ती काय राहणार? मग ते गेले चक्क रोजगार हमी योजनेच्या कामावर... "राजकारणातील छोटेसे पद हीच काही पिढ्यांच्या उदरनिर्वाहाची हमी' झालेल्या आजच्या काळात यावर कोणी विश्‍वास ठेवणार नाही; मात्र १९६७ ते १९७२ या काळात आमदार राहिलेले (कै.) बापूराव कृष्णाजी तथा बी. के. देशमुख त्यांच्या असाधारणतेमुळे आजही अकोलेवासीयांच्या स्मरणात आहेत.सध्या विधानसभा निवडणुकीचा "ज्वर' आधुनिक पुढाऱ्यांच्या अंगात भिनत असताना इथले लोक मात्र (कै.) देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या देशमुखांच्या आमदारकीचा काळ, त्यांची निरपेक्ष वृत्ती, निरिच्छ वर्तन आणि निःस्वार्थीपणा गावोगावच्या पारांवर रंगणारा विषय आहे. (कै.) देशमुख पंचायत समितीचे सभापती असताना तालुक्‍याला "आदर्श पंचायत समिती'चा पुरस्कार मिळाल्याची आठवणही आवर्जून सांगितली जाते.१९७२ च्या निवडणुकीत (कै.) देशमुख वसंतराव भांगरे (कॉंग्रेस) यांच्याकडून पराभूत झाले. १९७२ मधील पावसाने राज्यासह अकोले तालुक्‍यालाही "ठेंगा' दाखविला. त्यामुळे खरीप पीक वाया तर गेलेच; परंतु रब्बीही हाती आले नाही. जनावरांबरोबरच माणसांच्या जगण्याची भ्रांत निर्माण झाली. त्या काळात (कै.) देशमुख पत्नी पार्वताबाई यांच्यासह रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होते. कुटुंबातील पोरा-थोरांसह "किडका मिलो' व "सडका गहू' खात होते. नुकतीच आमदारकीची वस्त्रे सोडलेल्या या माणसाने आपले पाय नेहमीच जमिनीवर ठेवले, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी "सकाळ'ला सांगितले.देशमुख यांचे चिरंजीव जयवंत या वेळच्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जयवंत देशमुखांचे चिरंजीव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य आहेत.भांगरे यांचा साधेपणा - राजकारणातील साधेपणा हा अकोले भागाचा स्थायीभावच असावा; कारण १९५२ मध्ये निवडून आलेले गोपाळा भांगरे (कॉंग्रेस) हेदेखील लोकांना आठवतात ते केवळ त्यांच्या साध्या राहणीसाठी. दारी आलेल्याच्या मुखात दोन घास पडतील, हा त्यांचा अतिथिभाव होता. १९५७ मध्ये समाजवादी पक्षाचे नारायण नवाळी निवडून आले; परंतु १९६२ मध्ये आमदारकी जाताच या माजी आमदाराने चक्क पेढेविक्रीच्या दुकानात गल्ल्यावर बसणे पसंत केले. त्यांच्या वारसदारांना आजही राहण्यासाठी घर नाही. १९६२ मध्ये गोपाळा भांगरे यांच्या पुतण्याकडे यशवंतराव भांगरे यांच्याकडे आमदारकी आली. ६२ व ७२ मध्ये कॉंग्रेसकडून आणि नंतर १९७८ मध्ये समाजवादी कॉंग्रेसकडून निवडून आलेल्या यशवंतरावांनी "खानदानी राजकारण' केले. प्रचाराची पातळी सोडली नाही. प्रचार संपल्यानंतर घरी परतणाऱ्या स्पर्धक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना घरी नेऊन जेवू घातले. त्या घटनेचे साक्षीदार व विडी कामगार जैनुद्दीन शेख यांना तो प्रसंग आजही आठवतो. आज निवडणुका महाखर्चिक बनत असताना आणि निवडणुकीतील स्पर्धा शत्रुत्वाचे स्वरूप धारण करीत असताना देशमुख, नवाळी, भांगरे यांच्यासारखी माणसे काहीशा आख्यायिकाच बनल्यासारखी झाली आहेत.