Thursday, September 24, 2009

महर्षी

एके दिवशी महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात मुले अभ्यास करत असतात. त्या वेळी महर्षी म्हणतात, ""आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायची आहे.''महर्षी गोष्ट सांगायला लागतात ः एका राज्यात दोघे व्यापार करायचे. एकाचे नाव होते कुबेर आणि एकाचे फलिन. कुबेर सगळ्यांवर विश्‍वास ठेवायचा; पण फलिन मानायचा, की कोणावरही विश्‍वास ठेवणे हा वेडेपणा आहे.एके दिवशी कुबेर त्याच्या मुलाला घेऊन व्यापारासाठी बाहेरगावी गेला होता. तेथे त्याला राजाने बोलावून घेतले; पण त्याचा मुलगा त्याच्याच बरोबर होता म्हणून त्याने आपल्या दोन नोकरांना त्याच्या मुलाला घरी सोडण्याचे काम दिले. त्या दोघा ंचे नाव सबल व विमल होते. ते दोघेही कुबेरच्या मुलाला घरी सोडण्यास निघाले. बरोबर कुबेरने खूप पैसे दिले होते. वाटेत मोठे जंगल लागले. त्या दोघांनी विचार केला, की हा मुलगा छोटा आहे. म्हणून आपण या मुलाला इथेच जंगलात सोडू आणि सगळे पैसे घेऊन पळून जाऊ. मग नंतर त्यांनाच पश्‍चात्ताप होऊ लागला, की आपले मालक आपल्यावर खूप विश्‍वास ठेवतात आणि इथे आपण त्यांचा विश्‍वासघात करत आहोत, असे म्हणून त्यांनी मुलाला सुखरूप घरी पोचवले व पै सेही त्याच्या आईकडे दिले. महर्षी दोन मिनिटे शांत बसतात व म्हणतात, ""आता दुसऱ्या व्यापाऱ्याची गोष्ट ऐका!''एके दिवशी फलिनने त्याचा नोकर कणकला बोलाविले आणि सांगितले, ""बाजूच्या गावात व्यापार खूप चांगला चालेल. तू तेथे जाऊन व्यापार कर, मी पाच दिवसांत येतच आहे.'' कणक सगळे सामान घेऊन निघाला. खरंच, तेथे व्यापार चांगला चालत होता. कणकने विचार केला, की आपण सगळा माल स्वस्त किमतीत विकू व नंतर चौथ्या दिवशीच पळून जाऊ. जसा तो म्हटला, तसे झाले. चौथा दिवस उजाडला आणि पाहतो तर काय फलिन तेथे हजर होता. कणकने मालकाला विचारले, ""तुम्ही तर उद्या येणार होता. मग आजच का आलात?'' फलिन म्हणाला, ""मी येणार तर आजच होतो; पण मी तुला उद्या सांगितले.'' अशामुळे फलिन नुकसानीत जाण्यापासून वाचला. महर्षी म्हणाले, ""या गोष्टीचे काय तात्पर्य?'' हे ऐकून सगळी मुले चूप बसली. तेव्हा महर्षी म्हणाले, ""कोणावरही डोळे मिटून विश्‍वास ठेवू नये. कोणावरही मर्यादित प्रमाणातच विश्‍वास ठेवावा.

No comments:

Post a Comment