Thursday, October 1, 2009

सहलीच्या आनंदासाठी...

दूधवाला, पेपरवाला, फुलपुडीवाला किंवा रोज घरी सेवा पुरवणाऱ्या इतरांना किती दिवस घर बंद राहील, ह्याची निश्चित मदेऊ नका. उद्यापासून नको. परत कधी ते नंतर सांगेन. एवढा संवाद पुरे. दरवाजावर नोटीस लावू नका. तुमच्या घराजवळचे मित्र किंवा नातेवाईक ह्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक शेजारी अवश्य देऊन ठेवा. निघताना कितीही घाई झाली तरी डोके शांत ठेवून गॅस, पाणी, वीज आणि खिडक्या बंद कराव्यात. एकदा सहल सुरू झाल्यावर थोडी जरी शंका आली तरी सहलभर ते ओझे वाहावे लागते. एक चावी शेजारी अवश्य द्या. दागदागिने, रोकड शक्यतो बँक लॉकरमध्ये ठेवा. कपाटाच्या चाव्या कोठेतरी लपवू नका. ठरलेल्या ठिकाणीच ठेवा. मोबाईलमध्ये नंबर असतातच परंतु उतरल्यावर हॉटेल, वाहनचालक, तेथील संबंधित आणि नातेवाईकांचे फोननंबर वेगळ्या वहीत टिपून ठेवा. तुम्ही ज्या ज्या वाहनातून प्रवास कराल त्यांचे नंबर टिपून ठेवा. सहलीत रस्ता चुकलात तर पोलिस, पोलिस स्टेशन, सरकारी कार्यालये यांची नि:शंक मदत घ्या. तिथली प्रादेशिक भाषा पूर्ण येत नसेल तर ती तोडकीमोडकी बोलू नका. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. तेथील राजकारण आणि नेत्यांसंबंधी बोलणे टाळा. ज्या हॉटेलात उतराल त्याचे कार्ड सर्वांना खिशात ठेवायला द्या. शिवाय, स्वत:चे फोटो ओळखपत्र जवळ बाळगा. साध्या कपड्यात पानाच्या किंवा पेपर स्टॉलवर गेलात, तरी ते जवळ ठेवा. खिशात सहज बाळगता येईल, अशी छोटी बॅटरी जवळ ठेवा. सुट्टे पैसे नेहमी खिशात ठेवा. तिकिटे, बुकिंग यांच्या झेरॉक्स खिशात ठेवा. इंटरनेटरवर माहिती असते. पण बरोबर घेऊन जा. काही ठिकाणी ती नसतात परंतु कोठूनही ती तुमच्या मोबाईलवर रिचार्ज होऊ शकतात. त्या प्रदेशातील सणवारांची माहिती मिळवा. कारण एखादा सण स्थानिक पातळीवर इतका महत्त्वाचा असतो की त्या दिवशी सर्व व्यवहार बंद असतात. तुमच्या बरोबरच्या सर्व सदस्यांचे मोबाईल नंबर एकमेकांच्या मोबाईलवर सेव्ह करून टाका. कधी त्याचा उपयोग करावा लागेल, सांगता येत नाही. स्थानिक ठिकाणावरून बस सेवा, रेल्वे सेवा ह्यांची माहिती अधिकृत केंदावरूनच मिळवा. कारण स्थानिक रहिवाशांकडे ती अद्ययावत असतेच असे नाही. ज्याला विचारले तो अंदाजपंचे सांगून मोकळा होऊ शकतो. गावांची नावे नीट लक्षात ठेवा. कारण एकाच नावाची दोन-तीन गावे असू शकतात. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ उडू शकतो. सूचनांची मोठी यादी एवढ्यासाठीच की तुम्ही स्वनियोजित सहलीला जात असाल तर ह्यातील प्रत्येक गोष्ट सोयीची आहे. तुमचा प्रवास आणि सहल आनंदी करायची असेल तर वरील गोष्टी कटाक्षाने नुकत्याच गेलेल्या पर्यटकाकडून प्रत्यक्ष माहिती घ्या. सर्वच शहरांमध्ये रस्ते, पूल, इमारती यांच्यात सतत बदल होत असतात. तेथे भरलेल्या पाकिटाचे प्रदर्शन करीत फिरू नका. पाकिटमाराचे काम सोयीचे आणि अर्थपूर्ण व्हावे म्हणून खास टेहळणीसाठी एका चोराची नियुक्ती केलेली असते. मोबाईलची रिचार्ज कूपने पाळता येतील. कधी कधी अगदी क्षुल्लक गोष्टींनी सहलीचा विचका होतो. तसे होऊ नये, याच मनापासून शुभेच्छा! शुभास्ते पंथान: सन्तु।

No comments:

Post a Comment