Friday, October 9, 2009
कहाणी एका लग्नाची!
काय आहे? प्रश्न-प्रश्न आणि फक्त प्रश्नच आहेत समोर!(मजकुरातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)सुजाताच्या एकदम लक्षात आलं, की अमृताला माहेरी पाठवल्याला आठ दिवस होऊन गेले, पण अजूनही तिचे आई-वडील किंवा कोणी नातेवाईक, कोणीही कुठल्याच मार्गाने सुजाताशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी जाणूनबुजून फसवणूक केलीय, या शंकेला पुष्टी देणारीच ही गोष्ट होती.एक-दीड वर्षापूर्वीची गोष्ट. माझी मैत्रीण सुजाताच्या मुलाचं - अनिकेतचं नुकतंच लग्न झालं होतं. लगेचच दोघं कुलू-मनालीला गेले होते. आता ते आले असतील आणि एकूणच हालहवाल विचारावी म्हणून मी तिला फोन केला. म्हटलं, ""आले का चिरंजीव? कसे आहेत?'' वगैरे. तर म्हणाली, ""अगं, कसलं काय! माझं तर डोकंच चालेनासं झालंय. बरं झालं तू फोन केला...'' आणि तिनं जे सांगितलं ते ऐकून मलाही धक्काच बसला.तिच्या सुनेला - अमृताला चष्मा होता. ती लेन्सेस वापरत होती. दोघं हनीमूनहून आल्यावर अनिकेत सुजाताला म्हणाला, ""आई, अमृताला अडीचच नंबर आहे, पण त्यामानाने तिला दिसण्याबाबत खूपच प्रॉब्लेम आहे असं वाटतंय.'' आणि त्यानं तिकडे त्याला आलेले काही अनुभव सांगितले. मग सुजातालाही जाणवलं, की एकूण घरात वावरताना तिलाही अमृताबद्दल असंच मनात आलं होतं. म्हणून ती म्हणाली, ""ठीक आहे. अजून तुमची सुटी आहे तर तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. लेसरचे वगैरे काही उपचार हवे असतील तर करून घेऊ.''दोघंही डॉक्टरांकडे गेले. त्यांनी टेस्ट्स घेतल्या. ते खूपच गंभीर झाले होते. ते म्हणाले, ""हिचा नंबर खूपच जास्त म्हणजे सोळा आहे. हिला लेसर ट्रिटमेंटचा काहीही उपयोग नाही. एवढंच नाही तर हिला हाय-मायोपिया आहे. म्हणजे हिचा रे टिना इतका कमजोर आहे, की केव्हाही सरकू शकतात आणि तिला अंधत्व येऊ शकतं. ऑपरेशन करून ते नीट करता येतं; पण यशाची काहीच खात्री नाही आणि असं किती वेळा करावं लागेल याचाही काही अंदाज बांधू शकत नाही.'' हे सगळं ऐकल्यावर अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली. काही न बोलता दोघं घरी आले. सुजाताला सगळं सांगितलं. तीही सुन्न झाली. बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, की त्यातून सावरायला, विचार करायला वेळ मिळावा म्हणून अ मृताला माहेरी पाठवून दिलं. सुजाता तर धीराची, संयमी आहेच, पण त्या प रिस्थितीत संतापून, वेडंवाकडं बोलणं, वागणं, आक्रस्ताळेपणा वगैरे काहीही न करता अनिकेत ज्या संयमानं वागला त्याचं आम्हाला खूपच कौतुक वाटलं.पुढे काय करायचं ते बघायला हवंच होतं. इतकी गंभीर बाब आहे तेव्हा "सेकंड ओपिनियन' घ्यावं म्हणून दुसऱ्या नेत्ररोगतज्ज्ञांनाही दाखवलं. त्यांनीही तेच सांगितल ं. दोन्ही डॉक्टरांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र अनिकेतला जाणवली होती ती म्हणजे दोघांनीही त्याला "लव्ह-मॅरेज आहे का' असं विचारलं आणि ऍरेंज्ड मॅरेज आहे तर एवढा मोठा दोष तुम्हाला सांगायलाच हवा होता, असं म्हणाले. थोडक्यात काय, तर प्रेमात पडलेला माणूसच एवढा गंभीर दोष उघड्या डोळ्यांनी स्वीकारू शकतो अन्यथा ही सरळसरळ फसवणूक आहे, असंच दोघांनीही अप्रत्यक्षपणे सुचवले होते. शिवाय हे म्हणजे चक्रव्यूहात आपण होऊन शिरण्यासारखं आहे. ज्याला बाहेर यायचा रस्ताच नाहीय. लग्नाला पंधराच दिवस झाल्येत आणि एवढी मोठी फसवणूक समोर आल्येय. अशा वेळी भावनेच्या आहारी जाऊ नकोस. व्यवहारीपणे विचार कर, असा सल्लाही आपण होऊन दिला होता.आता पुढे काय करायचं, असा विचार करताना सुजाताच्या एकदम लक्षात आलं, की अमृताला माहेरी पाठवल्याला आठ दिवस होऊन गेले, पण अजूनही तिचे आई- वडील किंवा कोणी नातेवाईक कोणीही कुठल्याच मार्गाने सुजाताशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी जाणूनबुजून फसवणूक केलीय या शंकेला पुष्टी देणारीच ही गोष्ट होती. मग सुजातानंच त्यांना घरी बोलावून घेतलं. अमृताचा एवढा जास्त नंबर असताना फक्त अडीच नंबर आहे असं तुम्ही का सांगितलंत, असं विचारल्यावर तिचे वडील वैतागल्यासारख्या सुरात म्हणाले, ""अहो, तीन-तीन मुली आहेत मला. मी कोणा-कोणाचं काय-काय लक्षात ठेवू!'' एवढंच नाही तर पुढे असंही म्हणाले, की आम्ही काहीही सांगितलं असेल; तुम्ही त्यावर विश्वास कसा ठेवलात? चौकशी करायची होतीत तेव्हाच! त्यांचं हे वक्तव्य ऐकून ती हतबद्धच झाली. आता बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. तेव्हा ती म्हणाली, की आता यातून मार्ग काय? तर अगदी निर्विकारपणे ते म्हणाले, की आता आहे तसं दोघांनी निभावून न्यायचं, नाही तर वेगळं व्हायचं! स्वतःच्या मुलीचं आयुष्य एखादा माणूस इतक्या निगरगट्टपणे पणाला लावतो आणि त्याबद्दल त्याला जरासुद्धा अपराधी वाटत नाही आणि हे सगळं आपल्यासमोर प्रत्यक्ष घडतंय हे सगळंच सुजाता आणि अ निकेतसाठी अतिशय धक्कादायक होतं.आता घटस्फोटाशिवाय पर्याय नाही हे बुद्धीला पटलं होतं; पण ती वेळ येऊ नये अशीच मनापासूनची इच्छा होती. त्यातून असा विचार पुढे आला, की त्यांच्याच डॉक्टरांना भेटून एकदा विचारावं. बघू या ते काही मार्ग सुचवू शकतात का! म्हणून मग अमृताकडून त्यांचं नाव माहीत करून घेऊन अनिकेत त्यांना भेटला. आधी एकदम ते काही सांगायला तयार होईनात; पण अनिकेतनं त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. मग मात्र त्यांनी पूर्ण सहकार्य केलं; पण त्यांनी आधीच्या माहितीत जी भर घातली त्यानं उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फिरवलं. ते म्हणाले, ""चष्मा घालूनही तिला जेमतेम दहा-बारा फुटांपर्यंतच दिसू शकतं. शिवाय गाडी चालवणं आणि कॉ म्प्युटरवर काम करणं हे काहीच ती करू शकणार नाही. तिला जड उचलून चालणार नाही. कधीही येऊ शकणाऱ्या अंधत्वाची टांगती तलवार सतत डोक्यावर बाळगूनच तुम्हाला आयुष्य काढावं लागणार. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दोष तिच्यात जन्मजातच आहे आणि तो अनुवांशिकसुद्धा आहे. या सगळ्याची मी अ मृताच्या बाबांना पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांनी तुम्हाला हे सर्व लग्नापूर्वी सां गायलाच हवं होतं.''आता मात्र घटस्फोटाशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही हे नक्की झालं; पण आता अ मृतानं एक वेगळाच प्रश्न निर्माण केला. तिचं म्हणणं असं होतं, की माझा नंबर खूप जास्त आहे याव्यतिरिक्त मलाही बाकी काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे आपली फ सवणूक तिच्या वडिलांनी केलीय. ती निर्दोषच आहे आणि ती आहे तसा तिचा स्वीकार करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असं अनिकेतसारख्या सज्जन, सरळ मनाच्या मुलाला वाटायला लागलं. घटस्फोटाचा विचार करणं हे अपराधीपणाचं वाटायला लागलं. त्याचबरोबर तिचा स्वीकारही करणं अवघड वाटायला लागलं. आता मात्र सुजाता पार खचून गेली. पाच-सहा वर्षांपूर्वी तिचा नवरा गेला आणि नंतर कौटुंबिक आघातांची मालिकाच सुरू झाली. त्यातून ती आ णि अनिकेत अगदी तावून-सुलाखून बाहेर पडले होते. आता नव्या सुनेच्या साथीनं चांगल्या वेगळ्या आयुष्याला सुरवात करायची म्हणून मोठ्या उत्साहानं, उमेदीनं पाऊल टाकलं आणि वाट्याला आली जीवघेणी फसवणूक! त्याचे परिणाम आता कुठपर्यंत जाणार आहेत, या सगळ्यालाच आपण कसं तोंड देणार आहोत... तिच्यापुढचे प्रश्न काही संपतच नव्हते.पण तिला हातपाय गाळून चालणारच नव्हतं. तिनं अनिकेतला खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं समजावलं, की अमृता खोटं बोलतेय. पंचवीस वर्षांच्या मुलीला आपण नंबर नक्की किती आहे हे माहिती नसणं शक्यच नाही. तुझा साधा सरळ स्वभाव तिनं ओळखलाय. त्यामुळे ती तुला "इनोशनल ब्लॅकमेल' करू पाहतेय आणि तिचं म्हणणं खरं आहे असं धरलं तरी ती आता ज्या स्थितीत आहे ते तिचं दुर्दैव आहे. माणूस म्हणून तुला तिच्याबद्दल सहानुभूती वाटणं बरोबर आहे; पण म्हणून त्याची किंमत तुझी काहीही चूक नसताना तू चुकवणं हा तरी कुठला न्याय? लग्नानंतर तिला काही आजार झाला असता, तर ती जबाबदारी नक्कीच तुझी होती; पण लग्नापूर्वीच्या कुठल्याही गोष्टीला तू जबाबदार नाहीस. तुझ्यासारख्या धडधाकट, निर्व्यसनी, सज्जन, सर्व दृष्टीनं सक्षम आणि सुस्थित मुलाला तशीच मुलगी मिळणं हा तुझा हक्क आहे. नैतिकतेच्या चुकीच्या कल्पनेला बळी पडून आयुष्यभरासाठी तिचा स्वीकार करणं हे तुझ्या दृष्टीनं सरळ सरळ आत्महत्या करण्यासारखं आहे हे वास्तव त्याला पटवावं लागलं. त्याच्या मनातली अपराधीपणाची भावना काढावी लागली.यथावकाश त्याला घटस्फोट मिळाला. कायद्याप्रमाणे त्यानं जे काय पैसे, दागिने अमृताला द्यायचे ते दिले तेव्हा एक गोष्ट मात्र मनात आली, की ज्याची फसवणूक झालीय त्यालाच वर पैसेही द्यावे लागतात याला न्याय म्हणायचं का? आणि घेणाऱ्या ंना तरी ते घेताना काहीच कसं वाटत नाही?आता दोघंही बरीच सावरली आहेत. मित्रमंडळी, नातेवाईक- सगळेच त्याला सांगतायत, की तू झालं ते सगळं एक वाईट स्वप्न होतं, असं समजून विसरून जा आ णि पुन्हा लग्न कर. तुला एखादी सुयोग्य मुलगी सहज मिळेल. तो मुली बघायला तयारही झालाय. पण... हा पणच इतका मोठ्ठा आहे! कितीही ठरवलं तरी आता स मोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं अवघडच जातंय. जे समोर दिसतं आणि दाखवलं जातं त्यावर विश्वास ठेवून पुन्हा आयुष्याची बाजी लावायची का? आणि पुन्हा फ सवणूक पदरात पडली तर? पण नाही तर दुसरा मार्ग तरी
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment