Tuesday, September 29, 2009
मार्ग यशाचा
चे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीच उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळू शकते. त्यासाठी आपण सआपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वार्वप्रथम "मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामाला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरू तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे. चंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, ""नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते?'' यावर नंदूने त्याला सांगितले, ""अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते.''तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीच उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळू शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम "मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ती हे तरुण वक्ते तरुणांना कायम सांगतात "इम्पॉसिबल' (अशक्य) या इंग्रजी शब्दाची फोड करा. i m possible- आय एम पॉसिबल् अशी! म्हणजेच इम्पॉसिबल या शब्दातच पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला "आय' फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. "आय' म्हणजे - "मी.' मला शक्य आहे. "फक्त मलाच शक्य आहे,' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.सकारात्मक विचारांचा वसा -प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली? का झाली? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करू शकतो.पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम -म्हणजेच स्वतःबद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतःच्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतःचे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करू शकतो, तेवढा कोणीच करू शकत नाही. मला काय येते? मी काय करू शकतो? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.यशाचे समीकरण - यश = चिवट झुंज + अथक प्रयत्न + परिपूर्णतेचा ध्यास कामातील सुटसुटीतपणा, टापटीप, सुंदरता, नेटकेपणा, परिपूर्णता समोरच्या व्यक्तीला कायमच आकर्षित करीत असतात.यशस्वी माणूस कायम वेळेलाच सर्वांत जास्त महत्त्व देत असतो. मग ती वेळ स्वतःची असो वा दुसऱ्यांची. कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीला प्राध्यान्यद्यावे, हे यशस्वी व्यक्तीला बरोबर कळते.यश हवे असेल तर यशाच्या काही पायऱ्या आपल्याला चढायला हव्या.१) "अशक्य' हा शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचा हद्दपार करणे. २) सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारांची मनाला सवय लावणे. ३) उत्तम श्रोता होणे. ४) "परफेक्शन' - "परिपूर्णता' या गोष्टीचा ध्यास घेणे. ५) प्रगतिशील दृष्टिकोन ठेवून, यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहाणे. ६) स्वतःचे सामर्थ्य ओळखून त्यानुसार वाटचाल करणे. ७) चिकाटी, निश्चय, जिद्द आणि धैर्य आत्मसात करणे. ८) स्वतःच्या व इतरांच्या वेळेचे महत्त्व जपणे व कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे, हे अचूक ओळखणे. ९) उन्मत्तपणा, आळशीपणा, असमर्थता या गोष्टींना फाटा देऊन, प्रयत्नशीलता, उदारता, नम्रता या गोष्टी आत्मसात करणे.आपण सर्वांनीच हे कायम लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्याला आयुष्यात सोन्याची संधी मिळेलच असे नाही. पण आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे हे फक्त आपल्या आणि आपल्याच हातात असते. उगवणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी नवीन संधी असते, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.
पैसा... पैसा...पैसा...
बऱ्याच जणांच्या डोक्यात 'पैसा = करिअर' असं समीकरण पक्क असतं. परंतु हे पूर्णसत्य नाही. करिअर म्हटलं की पैसा आला
च. परंतु फक्त पैसा म्हणजे करिअर नव्हे हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं आणि ते मुलांच्या मनावरही बिंबवायला हवं. करिअर म्हणजे उत्तम रितीने जगणं, आपले छंद जोपासणं, समाजासाठी काहीतरी करणं, पुस्तकं वाचणं, चांगले चित्रपट, नाटक, कार्यक्रम पाहणं, कुटुंबासोबत वेळ (चांगला) घालवणं. नोकरी किंवा व्यवसाय करताना पैसा मिळवावा. याचा अर्थ असा नाही की पैशांच्या अभावात जगावं. परंतु म्हणून आयुष्यावर पैशांचा प्रभाव पडू देऊ नका. पैशांपेक्षाही अधिक चांगल्या आणि 'मौल्यवान' गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. आजच्या काळात बरेचजण पैशांचा विचार करतात. त्याच्यामागे ऊर फुटेस्तोवर धावतात. परंतु अशावेळी प्रत्येकाने आपल्याला किती पैसा हवा आहे, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. त्यानुसार आपल्या करिअरची आखणी करावी. कारण पैसा जितका कमवाल तितका तो कमीच असतो. त्यामुळे त्याच्या सीमारेषा आपणच आपल्या ठरवायला हव्यात. त्याबरोबरच आपल्या छंदांना, कुटुंबीयांना आणि आवडत्या इतर गोष्टींना आपण किती वेळ देणार आहोत याचाही विचार करायला हवा. आता तुम्ही मला विचाराल की याचा आणि करिअरचा काय संबंध? संबंध आहे. मागच्या काही लेखांमध्येही मी हे तुम्हाला सातत्याने सांगतोय. वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध तुमच्या करिअरशी आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी आहे. उदाहरणच द्यायचं तर, समजा एखाद्या माणसाला फिरण्याची खूप आवड आहे. परंतु तो त्याच्या व्यवसायामुळे किंवा ऑफिसातल्या कामांमुळे फिरायला बाहेर जाऊच शकला नाही तर काम करताना त्याचं मन त्या कामात लागत नाही. ते दूर कुठल्यातरी माळरानावर किंवा पर्वतांवर गेलेलं असतं. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होतो. हेच जर तो फिरायला गेला. सहाजिकच तो रूटिनमधून थोडा फ्री होऊन रिफ्रेश होतो. मग तो आपल्या कामावर पूर्ण एकाग्र होऊन जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. त्यामुळे पालकांनो आणि मुलांनो, आपले छंद जोपासा, खूप वाचा, फिरायला जा, चर्चा करा आणि सोबत मार्क्ससाठी लागणारा अभ्यासही भरपूर करा. कारण शिकणं ही तर आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे!
च. परंतु फक्त पैसा म्हणजे करिअर नव्हे हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं आणि ते मुलांच्या मनावरही बिंबवायला हवं. करिअर म्हणजे उत्तम रितीने जगणं, आपले छंद जोपासणं, समाजासाठी काहीतरी करणं, पुस्तकं वाचणं, चांगले चित्रपट, नाटक, कार्यक्रम पाहणं, कुटुंबासोबत वेळ (चांगला) घालवणं. नोकरी किंवा व्यवसाय करताना पैसा मिळवावा. याचा अर्थ असा नाही की पैशांच्या अभावात जगावं. परंतु म्हणून आयुष्यावर पैशांचा प्रभाव पडू देऊ नका. पैशांपेक्षाही अधिक चांगल्या आणि 'मौल्यवान' गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. आजच्या काळात बरेचजण पैशांचा विचार करतात. त्याच्यामागे ऊर फुटेस्तोवर धावतात. परंतु अशावेळी प्रत्येकाने आपल्याला किती पैसा हवा आहे, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. त्यानुसार आपल्या करिअरची आखणी करावी. कारण पैसा जितका कमवाल तितका तो कमीच असतो. त्यामुळे त्याच्या सीमारेषा आपणच आपल्या ठरवायला हव्यात. त्याबरोबरच आपल्या छंदांना, कुटुंबीयांना आणि आवडत्या इतर गोष्टींना आपण किती वेळ देणार आहोत याचाही विचार करायला हवा. आता तुम्ही मला विचाराल की याचा आणि करिअरचा काय संबंध? संबंध आहे. मागच्या काही लेखांमध्येही मी हे तुम्हाला सातत्याने सांगतोय. वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध तुमच्या करिअरशी आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी आहे. उदाहरणच द्यायचं तर, समजा एखाद्या माणसाला फिरण्याची खूप आवड आहे. परंतु तो त्याच्या व्यवसायामुळे किंवा ऑफिसातल्या कामांमुळे फिरायला बाहेर जाऊच शकला नाही तर काम करताना त्याचं मन त्या कामात लागत नाही. ते दूर कुठल्यातरी माळरानावर किंवा पर्वतांवर गेलेलं असतं. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होतो. हेच जर तो फिरायला गेला. सहाजिकच तो रूटिनमधून थोडा फ्री होऊन रिफ्रेश होतो. मग तो आपल्या कामावर पूर्ण एकाग्र होऊन जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. त्यामुळे पालकांनो आणि मुलांनो, आपले छंद जोपासा, खूप वाचा, फिरायला जा, चर्चा करा आणि सोबत मार्क्ससाठी लागणारा अभ्यासही भरपूर करा. कारण शिकणं ही तर आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे!
Thursday, September 24, 2009
महर्षी
एके दिवशी महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात मुले अभ्यास करत असतात. त्या वेळी महर्षी म्हणतात, ""आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायची आहे.''महर्षी गोष्ट सांगायला लागतात ः एका राज्यात दोघे व्यापार करायचे. एकाचे नाव होते कुबेर आणि एकाचे फलिन. कुबेर सगळ्यांवर विश्वास ठेवायचा; पण फलिन मानायचा, की कोणावरही विश्वास ठेवणे हा वेडेपणा आहे.एके दिवशी कुबेर त्याच्या मुलाला घेऊन व्यापारासाठी बाहेरगावी गेला होता. तेथे त्याला राजाने बोलावून घेतले; पण त्याचा मुलगा त्याच्याच बरोबर होता म्हणून त्याने आपल्या दोन नोकरांना त्याच्या मुलाला घरी सोडण्याचे काम दिले. त्या दोघा ंचे नाव सबल व विमल होते. ते दोघेही कुबेरच्या मुलाला घरी सोडण्यास निघाले. बरोबर कुबेरने खूप पैसे दिले होते. वाटेत मोठे जंगल लागले. त्या दोघांनी विचार केला, की हा मुलगा छोटा आहे. म्हणून आपण या मुलाला इथेच जंगलात सोडू आणि सगळे पैसे घेऊन पळून जाऊ. मग नंतर त्यांनाच पश्चात्ताप होऊ लागला, की आपले मालक आपल्यावर खूप विश्वास ठेवतात आणि इथे आपण त्यांचा विश्वासघात करत आहोत, असे म्हणून त्यांनी मुलाला सुखरूप घरी पोचवले व पै सेही त्याच्या आईकडे दिले. महर्षी दोन मिनिटे शांत बसतात व म्हणतात, ""आता दुसऱ्या व्यापाऱ्याची गोष्ट ऐका!''एके दिवशी फलिनने त्याचा नोकर कणकला बोलाविले आणि सांगितले, ""बाजूच्या गावात व्यापार खूप चांगला चालेल. तू तेथे जाऊन व्यापार कर, मी पाच दिवसांत येतच आहे.'' कणक सगळे सामान घेऊन निघाला. खरंच, तेथे व्यापार चांगला चालत होता. कणकने विचार केला, की आपण सगळा माल स्वस्त किमतीत विकू व नंतर चौथ्या दिवशीच पळून जाऊ. जसा तो म्हटला, तसे झाले. चौथा दिवस उजाडला आणि पाहतो तर काय फलिन तेथे हजर होता. कणकने मालकाला विचारले, ""तुम्ही तर उद्या येणार होता. मग आजच का आलात?'' फलिन म्हणाला, ""मी येणार तर आजच होतो; पण मी तुला उद्या सांगितले.'' अशामुळे फलिन नुकसानीत जाण्यापासून वाचला. महर्षी म्हणाले, ""या गोष्टीचे काय तात्पर्य?'' हे ऐकून सगळी मुले चूप बसली. तेव्हा महर्षी म्हणाले, ""कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नये. कोणावरही मर्यादित प्रमाणातच विश्वास ठेवावा.
Tuesday, September 22, 2009
कर्मवीर भाऊराव पाटील
इंग्रजी सहावीत नापास झाल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. तीच त्यांच्या जीवनाची सुरवात होती. कर्मवीर भाऊराव पाटील सामजिक परिस्थिती विषयी अतिशय संवेदनशील होते. इथल्या अनेक समस्यांवर शिक्षण हाच उपाय आहे हे त्यां नी ओळखले. त्यातूनच ग्रामीण भागातील समाजासाठी त्यांनी शिक्षणप्रसाराची चळवळ सुरु केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करुन तळागाळातील स माजासाठी ज्ञानाची दारे खुली केली.वर्गमित्र आत्मारामपंत ओगल्यांच्या काच कारखान्यात भाऊराव पाटील नोकरीला होते, त्या वेळची ही गोष्ट. हा कारखाना तेव्हा किर्लोस्करवाडीला होता. हाती घेतलेले काम सर्वस्व झोकून पूर्ण करायचे, ही त्यांची खासीयत. सचोटी, परिश्रम व चिकाटी या गुणांच्या जोरावर त्यांनी कारखान्याची भरभराट करून दाखवली. त्यांचे काम पाहून लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ओगल्यांकडे भाऊरावांची मागणी केली. मग भाऊराव त्यांच्याकडे काम करू लागले. उत्पादन वाढले, विक्री वाढली, त्यात भाऊरावांचा मोठा वाटा होता. नांगराची विक्री करताना ते अक्षरशः तहानभूक विसरून जायचे. शेतकरी, व्यापाऱ्यांना लोखंडी नांगराचे महत्त्व पटवून द्यायचे. प्रस ंगी स्वतः शेतात नांगर चालवून दाखवायचे. त्यामुळे भाऊरावांचा पगार वाढला. त्या काळी सोन्याचा भाव होता वीस रुपये तोळा. आणि दोन रुपयाला पोतंभर ज्वारी मिळायची. तेव्हा भाऊरावांचा मासिक पगार होता नव्वद रुपये. विक्रेता म्हणून काम करताना त्यांनी खूप पायपीट केली. ग्रामीण भागातील बहुजन समाजाची दुःखे जवळून पाहिली. त्यांच्या अज्ञानाचा कसा गैरफायदा घेतला जातो आहे, अंधश्रद्धा आणि जातीपातींमध्ये तो कसा अडकला आहे, हे त्यांनी पाहिले. गरीब, अस्पृश्य, मजूर यांची जगण्यासाठीची केविलवाणी धडपड त्यांनी बघितली. जन्मापासून मृत्यूपर्यंत धर्माच्या नावाखाली त्याला कसे लुबाडले जाते, हे त्यांनी पाहिले. या गुलामीतून त्यांची मुक्तता कशी होईल, अंधश्रद्धा कशा दूर होतील, त्यांच्या पोटात चार घास कसे पडतील, असे प्रश्न त्यांना सतावू लागले. यावर एकच उत्तर आणि ते म्हणजे शिक्षण, हे त्यांनी जाणले आणि त्या कार्यात पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला.कष्टांची लाज न वाटणे, कोणतेही काम कमीपणाचे किंवा प्रतिष्ठेचे न मानणे, आपल्या गरजा कमीत कमी करणे, खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणे, चारित्र्य, सेवा, देशप्रेम, त्याग यांसारख्या गुणांची जोपासना करण्याचे काम कर्मवीर अण्णा वस तिगृहात जाणीवपूर्वक करत. पैशावाचून गरिबाचे शिक्षण अडू नये, बहुजन स माजातील मुलेही बुद्धीने हुशार असतात, याची त्यांना जाणीव होती. शिक्षण आणि वसतिगृहातील सहजीवनातून जातपात संपेल, असा विश्वास त्यांना वाटत होता. त्यामुळेच विरोध असतानाही त्यांनी सर्व जातिधर्मांची मुले वसतिगृहात एकत्र ठेवली होती. वसतिगृहात त्यांनी "कमवा शिका' योजना सुरू केली. केवळ पुस्तकी विद्वान न बनता, व्यावहारिक शिक्षणाची जोड मुलांच्या आयुष्याला मिळाली. या योजनेत मुलांना शेतीची सर्व कामे करणे, जनावरे सांभाळणे, मुरुम खोदणे, खडी फोडणे, सुतार, गवंडी अशा कारागिरांच्या हाताखाली मुलांना काम करावे लागे. विटा तयार करणे, विहीर खोदणे अशीही कामे करावी लागत. ही कामे करूनही नियमित अभ्यासात मुले कुठेही कमी पडू नयेत याबाबत ते दक्ष असत. कष्टांची कामे केल्यामुळे बुद्धीवर किंवा यशावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे कर्मवीरांच्या वसतिगृहात राहून तयार झालेला विद्यार्थी अशा गुणांची श्रीमंती घेऊन बाहेर पडत असे. त्यामुळे ते समाजात उठून दिसत. त्यातून कर्मवीरांच्या कार्याकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. १९२४ मध्ये एक विद्यार्थी घेऊन त्यांनी वसतिगृह सुरू केले होते. पुढे वाढत वाढत वसतिगृहांची संख्या सत्तर -ऐंशीपर्यंत गेली. त्याचबरोबर त्यांनी खेडोपाडी शाळा सुरू करण्याचा ध्यास घेतला होता. त्यात अनेक अडचणी आल्या. गावाला शाळेची गरजच काय, इथपासून लोकांचे प्रश्न सुरू होत. अनेक गावांमध्ये शाळा सुरू करावी की नको, या विषयावर लोक देवाला कौल लावत.अशा वेळी कधीकधी कर्मवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खोटेपणा करावा लागे. अनुकूल कौल लावून घेतल्यावर शाळा सुरू करता येत असे. अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी ते चालत गेले, कधी बै लगाडीने गेले. प्रसंगी घोड्यावरून गेले. सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात त्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या. १९५० पर्यंत त्यांनी सातारा-कोल्हापूर परिसरात सुरू केलेल्या शाळांची संख्या ५७८ वर गेली. बहुजन समाजातील मुले शिकू लागली होती. अनेक गावांत पत्र आले तर वाचून घेण्यासाठी दुसऱ्या गावातील वाचता येणाऱ्या व्यक्तीकडे जावे लागत असे. मणभर लाकडे फोडून दिल्यावर पत्र वाचून त्यातील मजकूर समजत असे. आता घराघरात ज्ञानाचा दिवा प्रकाशत होता. त्यामुळे पत्र वाचण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जाणे बंद झाले. एव्हाना संस्थेचे ना मकरण रयत शिक्षण संस्था असे झाले होते. १९४७ मध्ये त्यांनी साताऱ्यात महा विद्यालय सुरू केले. सगळ्या जाती-धर्मांच्या मुलांना घेऊन अण्णांनी शिक्षणप्रसाराचे काम सुरू केले होते. त्याच पद्धतीने सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्यांनी या महा विद्यालयाला दिले. देणगी घेऊन, पैशाच्या जोरावर हे नाव बदलण्यास त्यांनी ठाम नकार दिला. त्याचप्रमाणे बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या नावानेही त्यांनी साताऱ्यात हायस्कूल सुरू केले. अर्थात त्यासाठी कोणतीही मदत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळू शकली नाही. समाजातील कर्मकांड, अज्ञान, अं धश्रद्धा, धर्मभोळेपणा यावर सडकून टीका करत समाजाला शहाणे करण्याचे व्रत ज्या माहात्म्याने आयुष्यभर घेतले होते, त्या संत गाडगे महाराजांच्या नावाने त्यांनी १९५४ मध्ये कराडला महाविद्यालय सुरू केले. जो बहुजन समाज धार्मिक विधी आणि कर्मकांडांच्या ओझ्याखाली अज्ञानात वर्षानुवर्षे पिचत होता, त्या समाजाला अण्णांनी शिक्षणाची दारे उघडी करून दिली. एवढेच नव्हे, तर अठराविश्व दारिद्य्र असणाऱ्या कुटुंबांतील अनेक मुलांना त्यांनी आपल्या खांद्यावर बसवून वसतिगृहात आणले. त्यांची देखभाल केली. त्यांना अपार प्रेम दिले. शिक्षणाबरोबरच कष्टांचे संस्कार त्यांच्या मनावर केले. त्याचा परिणाम म्हणून धर्माच्या ग्लानीत पडलेला समाज जागृत झाला. नव्या महाराष्ट्राची उभारणी होत असताना अण्णांच्या मुशीतून घडलेल्या अनेक नामवंतांनी त्यात योगदान दिले.----------कर्मकांडांना विरोध आणि सडेतोड स्वभाव यामुळे भाऊरावांना शाळेत शिकत असताना कोल्हापुरातील वसतिगृह सोडावे लागले. त्यांच्या एका वर्गमित्राच्या मदतीने त्यांना शाहू महाराजांचे कृपाछत्र लाभले. तेथे त्यांना भरपूर खुराक मिळाला. त्यांची प्रकृती दणकट आणि मजबूत बनली. त्यांना कुस्त्यांची आवड लागली. कधी-कधी ते राजवाड्यातील मुलांबरोबर क्रिकेटही खेळत. एकदा बॅटिंग करताना त्यांनी सगळी ताकद लावून चेंडू टोलावला आणि राजवाड्याच्या खिडकीची काच फ ुटली. चेंडू इतका उंच आणि लांब जाईल याची कुणालाच कल्पना नव्हती. आता महाराज शिक्षा करणार म्हणून सगळी मुले घाबरली. सगळ्या मुलांना महाराजांसमोर उभे राहण्याची वेळ आली. महाराजांनी विचारले, ""क्रिकेट कोण खेळत होते?''""आम्ही राजवाड्यातील मुले,'' त्यातील धीट मुले म्हणाली.त्यावर प्रश्न आला, ""काचेवर कुणी चेंडू मारला?'' भाऊराव पुढे होऊन धीटपणे म्हणाले, ""महाराज खिडकीची काच मी मारलेल्या चेंडूमुळे फुटली. एवढा उंच चेंडू जाईल, असे मला वाटले नव्हते.''""म्हणजे तुझ्याकडून गुन्हा झाला आहे,'' महाराज म्हणाले.""होय महाराज, पण मुद्दाम नाही; चुकून घडले. जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे,'' भाऊराव म्हणाले.हे ऐकून महाराजांचा चेहरा फुलला. खरे बोलण्यावर ते खूष झाले आणि म्हणाले, ""तुला माझी भीती कशी वाटली नाही?''भाऊराव म्हणाले, ""त्यात कसली भीती? चूक झाल्यावर जे घडले ते खरे सांगायचे आणि मिळेल ती शिक्षा भोगायची.''त्यावर महाराज म्हणाले, ""तू खरे बोललास म्हणून तुला शिक्षा माफ. जा पळ आता.''-----------------लक्ष्मीबाईंची त्यागी वृत्तीसाताऱ्यातील धनिणीच्या बागेत वसतिगृह सुरू झाले होते. तिथे साठ-सत्तर मुले राहून काम करून शिकत होती. अनेकदा कर्मवीर देणग्या मिळवण्यासाठी बाहेर पडले, की चार-सहा दिवस परत येत नसत. तोपर्यंत एखाद्या वेळी वसतिगृहातील धान्य संपून जात असे. दुकानदार उधारीवर देत नसत. कारण पूर्वीची उधारी शिल्लक असायची. धान्याचा कण शिल्लक नाही म्हटल्यावर वसतिगृहाचा सेक्रेटरी व हिनींकडे म्हणजे अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाईंकडे येत असे. अण्णा आले का, विचारल्यावर नकारार्थी उत्तर मिळत असे. पण कशासाठी विचारल्यावर तो प रिस्थिती सांगायचा. मग त्या म्हणायच्या, ""असे कर, हा माझा दागिना घे; मोडून आलेल्या पैशाची ज्वारी आणा आणि स्वयंपाक करा.'' मग तो सेक्रेटरी जात असे आणि व्यवस्था करत असे. असे करता-करता लक्ष्मीबाईंनी त्यांच्याकडील ऐंशी- नव्वद तोळे दागिने विकले. गोरगरिबांची मुले शिकावीत म्हणून एवढा त्याग करणारी माउली दुसरी सापडणार नाही. सगळे दागिने संपल्यावर जेव्हा पुन्हा तशीच वेळ आली, तेव्हा भुकेल्या मुलांच्या तोंडाकडे पाहवत नाही म्हणून त्यांनी गळ्यातील मं गळसूत्र काढून पुडीत बांधून मोडण्यासाठी दिले. बहुजन समाजातील मुले शिकावीत, हा समाज अंधकारातून बाहेर पडावा, त्याने प्रगती करावी म्हणून या माउलीने केलेल्या त्यागाची तुलना करता येणार नाही.
जेव्हा माजी आमदार गेले 'रोहयो'च्या कामावर
वर्ष १९७२... दुष्काळ पडलेला आणि "ते' माजी आमदार होते; पण "आजी' असतानाही पदाची नशा नव्हती, तर आता ती काय राहणार? मग ते गेले चक्क रोजगार हमी योजनेच्या कामावर... "राजकारणातील छोटेसे पद हीच काही पिढ्यांच्या उदरनिर्वाहाची हमी' झालेल्या आजच्या काळात यावर कोणी विश्वास ठेवणार नाही; मात्र १९६७ ते १९७२ या काळात आमदार राहिलेले (कै.) बापूराव कृष्णाजी तथा बी. के. देशमुख त्यांच्या असाधारणतेमुळे आजही अकोलेवासीयांच्या स्मरणात आहेत.सध्या विधानसभा निवडणुकीचा "ज्वर' आधुनिक पुढाऱ्यांच्या अंगात भिनत असताना इथले लोक मात्र (कै.) देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या देशमुखांच्या आमदारकीचा काळ, त्यांची निरपेक्ष वृत्ती, निरिच्छ वर्तन आणि निःस्वार्थीपणा गावोगावच्या पारांवर रंगणारा विषय आहे. (कै.) देशमुख पंचायत समितीचे सभापती असताना तालुक्याला "आदर्श पंचायत समिती'चा पुरस्कार मिळाल्याची आठवणही आवर्जून सांगितली जाते.१९७२ च्या निवडणुकीत (कै.) देशमुख वसंतराव भांगरे (कॉंग्रेस) यांच्याकडून पराभूत झाले. १९७२ मधील पावसाने राज्यासह अकोले तालुक्यालाही "ठेंगा' दाखविला. त्यामुळे खरीप पीक वाया तर गेलेच; परंतु रब्बीही हाती आले नाही. जनावरांबरोबरच माणसांच्या जगण्याची भ्रांत निर्माण झाली. त्या काळात (कै.) देशमुख पत्नी पार्वताबाई यांच्यासह रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होते. कुटुंबातील पोरा-थोरांसह "किडका मिलो' व "सडका गहू' खात होते. नुकतीच आमदारकीची वस्त्रे सोडलेल्या या माणसाने आपले पाय नेहमीच जमिनीवर ठेवले, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी "सकाळ'ला सांगितले.देशमुख यांचे चिरंजीव जयवंत या वेळच्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जयवंत देशमुखांचे चिरंजीव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य आहेत.भांगरे यांचा साधेपणा - राजकारणातील साधेपणा हा अकोले भागाचा स्थायीभावच असावा; कारण १९५२ मध्ये निवडून आलेले गोपाळा भांगरे (कॉंग्रेस) हेदेखील लोकांना आठवतात ते केवळ त्यांच्या साध्या राहणीसाठी. दारी आलेल्याच्या मुखात दोन घास पडतील, हा त्यांचा अतिथिभाव होता. १९५७ मध्ये समाजवादी पक्षाचे नारायण नवाळी निवडून आले; परंतु १९६२ मध्ये आमदारकी जाताच या माजी आमदाराने चक्क पेढेविक्रीच्या दुकानात गल्ल्यावर बसणे पसंत केले. त्यांच्या वारसदारांना आजही राहण्यासाठी घर नाही. १९६२ मध्ये गोपाळा भांगरे यांच्या पुतण्याकडे यशवंतराव भांगरे यांच्याकडे आमदारकी आली. ६२ व ७२ मध्ये कॉंग्रेसकडून आणि नंतर १९७८ मध्ये समाजवादी कॉंग्रेसकडून निवडून आलेल्या यशवंतरावांनी "खानदानी राजकारण' केले. प्रचाराची पातळी सोडली नाही. प्रचार संपल्यानंतर घरी परतणाऱ्या स्पर्धक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना घरी नेऊन जेवू घातले. त्या घटनेचे साक्षीदार व विडी कामगार जैनुद्दीन शेख यांना तो प्रसंग आजही आठवतो. आज निवडणुका महाखर्चिक बनत असताना आणि निवडणुकीतील स्पर्धा शत्रुत्वाचे स्वरूप धारण करीत असताना देशमुख, नवाळी, भांगरे यांच्यासारखी माणसे काहीशा आख्यायिकाच बनल्यासारखी झाली आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
